scorecardresearch

Premium

World Cup 2023: अश्विनच्या डुप्लिकेटने कांगारूंच्या मनसुब्यांवर फिरवले पाणी, कोण आहे ‘हा’ खेळाडू ज्याने ऑस्ट्रेलियाबरोबर सरावास दिला नकार?

ICC World Cup 2023: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अश्विनच्या डुप्लिकेट फिरकीपटूला सराव सत्रात गोलंदाजी करण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर स्टार ऑफस्पिनरने ही ऑफर नाकारली आहे. कोण आहे तो? जाणून घ्या.

World Cup 2023: Ashwin's duplicate rejects the offer Kangaroos who is Mahesh Pithiya refused to train with Australia
पिठियाने ऑस्ट्रेलियाची ही ऑफर नाकारली आहे. सौजन्य- (ट्वीटर)

ICC World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३आधी ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापनाने रविचंद्रन अश्विनच्या डुप्लिकेट महेश पिठियाला सराव सत्रादरम्यान गोलंदाजीसाठी बोलावले. मात्र, पिठियाने ऑस्ट्रेलियाची ही ऑफर नाकारली आहे. वास्तविक, महेश पिठिया भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्याकडून खेळतो आणि महेशने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये काम केले होते. अक्षर पटेल वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर अश्विनची निवड करण्यात आली, त्यानंतर महेशला ही ऑफर मिळाली. महेशची गोलंदाजीची अ‍ॅक्शन ही आर. अश्विनसारखीच आहे.

महेश पिठिया याने स्पोर्टस्टारशी बोलताना सांगितले की, “ही निश्चितच एक आश्चर्यचकित करणारी ऑफर होती, परंतु नंतर पुन्हा आगामी विश्वचषक २०२३ हा भारतात होणार आहे असा विचार केला. तसेच, मी देखील पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या देशांतर्गत हंगामासाठी बडोदा संघाचा भाग आहे. त्यामुळेच, मी या ऑफरबद्दल विचार केला, आमच्या प्रशिक्षकाशी बोललो आणि त्यांना कळवले की मला यावेळी शिबिरात उपस्थित राहणे शक्य होणार नाही.”

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: शानदार इनिंग खेळूनही विराट दिसला नाराज, कपाळावर मारुन घेतानाचा VIDEO व्हायरल
Shubman Gill infected with dengue
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिल खेळणार की नाही? राहुल द्रविडने त्याच्या प्रकृतीबाबत दिली लेटेस्ट अपडेट
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video
Who is Sameer Khan who stunned Marcus Stoinis and Steve Smith
IND vs AUS: ऑस्ट्रेलियन दिग्गजांना नेट प्रॅक्टिसमध्ये आपल्या गोलंदाजीने चकीत करणारा, कोण आहे समीर खान?

हेही वाचा: IND vs ENG Warm Up Match: टीम इंडियाचा अभ्यास पाण्यात! भारत विरुद्ध इंग्लंड गुवाहाटीतील सराव सामना पावसामुळे रद्द

महेश पुढे म्हणाले की, “बीसीसीआयने अक्षराच्या जागी अश्विनची घोषणा करताच मला फोन आला. आंतरराष्ट्रीय संघांबरोबर काम करणे नेहमीच अनुभव देणारी बाब असते, पण माझे प्राधान्य देशांतर्गत क्रिकेटला आणि भारतीय संघाला असते. बडोद्या संघाकडून खेळल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. या दीर्घ हंगामापूर्वी मला वाटले की, मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या सराव शिबिरात सहभागी होऊ नये.”

अक्षरऐवजी अश्विनला संधी मिळाली आहे

अक्षर पटेल दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने आर अश्विनचा संघात समावेश केला आहे. मात्र, आर अश्विनप्रमाणे महेश पिठिया देखील ऑस्पिन गोलंदाजी करतो आणि दोघांची गोलंदाजी सारखीच आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने महेशला ऑफर दिली होती. मात्र आपल्या प्रशिक्षकाचा सल्ला घेतल्यानंतर त्याने कांगारूंचा हा प्रस्ताव नाकारला आहे.

हेही वाचा: World Cup 2023: विश्वचषक २०२३नंतर टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू घेणार निवृत्ती; गुवाहाटीत म्हणाला, “हा माझा शेवटचा वर्ल्डकप…”

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सराव सामना पावसामुळे रद्द

विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्व संघ सराव सामन्यात सहभागी होत आहेत. गुवाहाटी येथे शनिवारी (३० सप्टेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर हवामान खराब झाल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे अंपायर्सनी बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द झाल्याचे घोषित केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup 2023 australia calls duplicate ashwin mahesh pithiya but this off spinner rejects the offer avw

First published on: 30-09-2023 at 19:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×