Team India Semi Final Scenario Asia Cup Rising Star 2025: एशिया कप २०२५ स्पर्धेनंतर आता रोहामध्ये एशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेला भारतीय अ संघाने दणक्यात सुरूवात केली होती. पहिल्या सामन्यात यूएईचा एकतर्फी पराभव केल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने यूएईविरूद्ध झालेल्या सामन्यात १४८ धावांनी विजय मिळवला होता. रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेतील सलग २ सामने जिंकून पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ टॉप ४ मध्येही प्रवेश करू शकलेला नाही. भारतीय संघाला पराभूत करण्यापूर्वी पाकिस्तानने ओमानला पराभूत केलं होतं. मात्र, भारतीय संघाला अजूनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. दरम्यान कसं आहे समीकरण? घ्या.
भारतीय संघासाठी सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?
भारतीय संघाचा पुढील सामना ओमानविरूद्ध होणार आहे. हा भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. जर हा सामना जिंकला, तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र, या सामन्यातही पराभव झाला, तर दक्षिण आफ्रिकेचा संफ स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. भारताने एकतर्फी पराभूत केलेला यूएईचा संघ या स्पर्धेतून आधीज बाहेर पडला. त्यामुळे आता भारतीय संघासाठी सेमीफानयल जाण्याचा मार्ग मोकळा आहे. या स्पर्धेसाठी विभागण्यात आलेल्या दुसऱ्या गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे.
पाकिस्तानकडून भारतीय संघाचा पराभव
रविवारी झालेल्या सामन्यात भारत अ आणि पाकिस्तान अ हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर नमन धीरने ३५ धावा केल्या. भारतीय संघाने २० षटकांअखेर १३६ धावा केल्या. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १३८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून माज सदाकतने नाबाद ७९ धावांची खेळी केली. तर शेवटी मोहम्मद फइकने १६ धावांची खेळी केली आणि संघाला विदय मिळवून दिला.
