scorecardresearch

Premium

Asian Games 2023: एशियन गेम्समध्ये भारताने रचला इतिहास! प्रथमच जिंकली ७० हून अधिक मेडल्स; १९५१ पासूनच्या पदकांची आकडेवारी

Asian Games 2023: भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक नोंद करत १९५१ पासून ते आतापर्यंतच्या सर्व आवृत्यांमध्ये कधीही इतकी पदके जिंकली नव्हती तेवढी यावेळी जिंकली आहेत. पहिल्यांदाच भारताने ७० हून अधिक पदके जिंकली आहेत.

India won more than 70 medals for the first time Know from 1951 till now when and how many medals were won
पहिल्यांदाच भारताने ७० हून अधिक पदके जिंकली आहेत. सौजन्य- (ट्वीटर)

Asian Games 2023: २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धे २०२३मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने आपली उत्कृष्ट अशी लय कायम ठेवत ११व्या दिवशी सकाळी भारताने दोन पदके जिंकली. पहिले पदक ३५ किलोमीटर शर्यतीत आणि दुसरे पदक तिरंदाजीमध्ये होते. पहिल्या १० दिवसांत ६९ पदके जिंकणाऱ्या भारताने ११व्या दिवशी ७१चा जादुई आकडा गाठला आणि सर्व जुने विक्रम मोडीत काढले.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी कधीही आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७१ पदके जिंकली नव्हती. ज्योती सुरेखा आणि ओजस देवतळे या जोडीने मिश्र तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताला ७१वे पदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताची कामगिरी कशी राहिली आहे ते जाणून घेऊया.

19th Asian Games 2023 Updates
Asian Games स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय खेळाडूंचे कौतुक; म्हणाले, “संपूर्ण देशासाठी…”
19th Asian Games 2023 Updates
Asian Games: तिरंदाजीमध्ये ओजस-ज्योती जोडीने सुवर्णपदक जिंकताच भारताने रचला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
46 days 48 matches and one champion Will India repeat history after 12 years The hosts have won the last three World Cups
World Cup 2023: ४६ दिवस, ४८ सामने अन् एक चॅम्पियन; भारत १२ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करणार? मागील तीन विश्वचषक जिंकले यजमानांनी
Sift Kaur won the country's 5th gold medal in shooting at Asian Games 2023
Asian Games 2023: सिफ्ट कौरने विश्वविक्रमासह जिंकले सुवर्णपदक, ५० मीटर थ्री पोझिशन रायफलमध्ये भारताने नोंदवली हॅटट्रिक

आशियाई क्रीडा स्पर्धा या खेळांना १९५१ मध्ये सुरू झाली. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा या दिल्ली येथे झाल्या होत्या आणि यजमान भारताने एकूण ५१ पदके जिंकली. यामध्ये १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, यानंतर भारताला ५० पदके मिळविण्यासाठी ३१ वर्षे वाट पाहावी लागली. १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १३ सुवर्णांसह ५७ पदके जिंकली होती. १९५४ मध्ये भारताने एकूण १७ पदके जिंकली आणि १९५८ मध्ये केवळ १३ पदके जिंकली होती, तर १९५१ मध्ये भारताने १५ सुवर्ण जिंकले.

असा एक प्रसंग १९९० मध्ये आला होता, जेव्हा भारत पदकतालिकेत पहिल्या १० मध्येही नव्हता. या वर्षीही भारताकडे केवळ २३ पदके होती. त्यात एकच सुवर्णपदक होते. १९९८ पासून भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आणि २००६ मध्ये प्रथमच भारताने घरापासून दूर ५० हून अधिक पदके जिंकली. तेव्हापासून भारत सतत ५० हून अधिक पदके जिंकत आहे. २०१० मध्ये, भारताने ६५ पदके जिंकली आणि सर्वाधिक पदकांचा नवा विक्रम केला. २०१८ मध्ये, भारताने यात आणखी सुधारणा केली आणि ७० पदके जिंकली. आता २०२३ मध्ये, भारताने ७१ हून अधिक पदके जिंकली आहेत आणि इतर अनेक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून पदके मिळवली आहेत. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडू नवी यशोगाथा लिहिणार हे निश्चित आहे. यावेळी शंभरी पार करण्याचा नारा देत भारतीय खेळाडू हांगझाऊकडे रवाना झाले होते. अशा स्थितीत यंदा भारताच्या झोळीत १०० पदके येतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: World Cup: १२ वर्षानंतर भारत वर्ल्डकप जिंकेल का? कर्णधार रोहित शर्माचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “माझ्याकडे उत्तर नाही…”

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी
वर्षसुवर्णरौप्यकांस्यएकूण पदके
१९५१ १५१६२०५१
१९५४ १७
१९५८१३
१९६२१०१३१०३३
१९६६११२१
१९७०१०२५
१९७४१२१२२८
१९७८११११२८
१९८२१३१९२५५७
१९८६२३३७
१९९०१४२३
१९९४१६२३
१९९८१११७३५
२००२१११२१३३६
२००६१०१७२६५३
२०१०१४१७३४६५
२०१४१११०३६५७
२०१८१६२३३१७०
२०२३१६२७३१७४*

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India made history in the asian games 2023 over 70 medals won for the first time statistics of medals since 1951 avw

First published on: 04-10-2023 at 15:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×