scorecardresearch

Premium

World Cup: १२ वर्षानंतर भारत वर्ल्डकप जिंकेल का? कर्णधार रोहित शर्माचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “माझ्याकडे उत्तर नाही…”

ICC World Cup 2023: २०१३ मध्ये भारताने एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली जेव्हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा रोहित शर्मा संघाचा एक भाग होता. त्यानंतर आजपर्यंत भारताने क्रिकेटच्या कुठल्याही आयसीसी फॉरमॅटमध्ये ट्रॉफी जिंकलेली नाही.

World Cup: Will India win the World Cup after 12 years Captain Rohit Sharma's surprising statement Said I don't have an answer
रोहित शर्मा अँड कंपनीकडून ट्रॉफीचा दुष्काळ संपणार अशी आशा चाहत्यांना वाटत आहे. सौजन्य- (ट्वीटर)

ICC World Cup 2023, Rohit Sharma: भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकून एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. २०१३ मध्ये भारताने जेव्हा एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा रोहित शर्मा संघाचा एक भाग होता. २०१३ पासून, भारत तिन्ही फॉरमॅटमधील नऊ आयसीसी स्पर्धांमध्ये खेळला आहे, परंतु त्यांना आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. काही तज्ञांनी तर भारताला नवीन चोकर्स म्हणायला सुरुवात केली आहे. आता, एकदिवसीय विश्वचषक २०२३ला फक्त एक दिवस बाकी असताना, रोहित शर्मा अँड कंपनीकडून ट्रॉफीचा दुष्काळ संपणार अशी आशा चाहत्यांना वाटत आहे.

यावर्षीचा विश्वचषक हा भारतात होणार आहे. भारत मायदेशात विश्वचषक खेळत असल्याने रोहित आणि संघावर खूप दडपण आहे. भारत या वर्षी तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकेल का? असा प्रश्न रोहित शर्माला विचारला असता कर्णधाराने अतिशय मुत्सद्दी आणि आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले.

India Vs England 3rd Test Rohit Sharma Video Viral
IND vs ENG : रोहित शर्माने बूट उचलला, अन् जैस्वाल-सर्फराझसह इंग्लंडचे खेळाडू फिरले माघारी, VIDEO व्हायरल
Rohit Sharma taunts Jadeja Video Viral
IND vs ENG : नो बॉलवरून रोहित शर्माचा जडेजाला टोमणा, लाईव्ह सामन्यात म्हणाला “अरे यार आयपीएलमध्ये तर…”
Nasir Hussain believes Kohli unavailability is a loss for world cricket including India sport news
कोहलीच्या अनुपलब्धतेमुळे भारतासह जागतिक क्रिकेटचे नुकसान! इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांचे मत
Indian tennis team wins Davis Cup match during tour of Pakistan
भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अपेक्षित कामगिरीसह जागतिक गट ‘१’मध्ये प्रवेश

रोहितने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “माझ्याकडे याचे उत्तर नाही. आता मी असे कसे म्हणू? मी फक्त आशा करू शकतो की संघ चांगल्या स्थितीत खेळत आहे. प्रत्येकजण फिट आणि फॉर्ममध्ये आहे. मी एवढीच आशा करू शकतो. यापलीकडे मी काही बोलू शकत नाही. चांगले विचार करणे हा एक महत्त्वाचा घटक आहे. आम्ही बाहेर काय घडत याचा विचार करत नाही आणि ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.”

हेही वाचा: World Cup 2023: १२ वर्षांनंतर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा उचलणार वर्ल्डकप ट्रॉफी, ICCच्या ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी झाली नियुक्ती

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानसह भारत विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जातो. टीम इंडिया या क्षणी फॉर्ममध्ये असून वेस्ट इंडीज, आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्याने आत्मविश्वास वाढला आहे. भारताने आशिया चषक जिंकत आहेत आणि पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्याने टीम इंडियातील सर्व कमकुवत बाजू या दूर झाल्या आहेत.

आपल्या छोट्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत, रोहितने दोन आशिया कप जिंकले आहेत, २०२२ मध्ये भारताला टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि यावर्षी WTC च्या अंतिम फेरीत नेले आहे. भारतीय कर्णधाराने पाच आयपीएल विजेतेपदे जिंकल्यामुळे रोहित विश्वचषकही जिंकेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या प्रवासाबद्दल विचारले असता, ३६ वर्षीय हिटमॅन म्हणाला, “तो एक स्वयंनिर्मित कर्णधार आहे आणि त्याच्या कारकिर्दीला आकार देण्यात कोणीही महत्त्वाची भूमिका बजावली नाही.”

हेही वाचा: Asian Games 2023: बजरंग पुनियासाठी पदकाचा मार्ग झाला खडतर, कुस्तीचे सामने ग्रीको-रोमन प्रकाराने होणार सुरू

रोहित पुढे म्हणाला, “मला काय करायचे आहे हे मला स्वतःला समजते. खरे सांगायचे तर, माझ्या प्रवासात फारशी लोकांची भूमिका नाही, आज मी जे काही निर्माण केले आहे ते माझ्यामुळेच आहे, अर्थातच माझ्या कुटुंबाचा आणि मित्रांचा, सर्वांचा पाठिंबा असल्याने मी इथपर्यंत पोहचलो.” भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup 2023 rohit sharmas answer on the possibility of winning the world cup said i dont say anything avw

First published on: 04-10-2023 at 14:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×