भारताच्या महेश भूपती, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर खेळताना विजयी सलामी दिली आहे. अनुभवी महेश भूपतीने ऑस्ट्रियन साथीदार ज्युलियन कोन्लेच्या साथीने खेळताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. आठव्या मानांकित भूपती-कोन्ले जोडीने बिगर मानांकित अर्जेटिनाच्या लिओनाडरे मेयर आणि स्पेनच्या अल्बटरे रामोस जोडीवर ६-२, ६-७ (५), ६-४, ६-२ असा विजय मिळवला. दुसरा सेट वगळता भूपती-कोन्ले जोडीला ब्रेकपॉइंट्सची संधी मिळाली नाही. पुढच्या फेरीत त्यांचा मुकाबला अमेरिकेच्या निकोलस मोन्रो आणि जर्मनीच्या सिमोन स्टॅडलर जोडीशी होणार आहे. भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा सहकारी रॉजर व्ॉसेलिन यांनी जार्को नोमिनेन आणि दिमित्री तुस्रुनोव्ह यांच्यावर ७-६, २-६, ७-६ असा विजय मिळवला. तर सानिया मिझाने आणि तिची सहकारी ह्य़ुबर यांनी व्होराकोव्हा आणि झोकापालोव्हा यांना
६-३,३-६,६-१ असे पराभूत केले.