न्यूझीलंडविरुद्ध मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या एकदिवसीय मालिकेतील भारतीय महिलांचा संघच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय महिला क्रिकेट निवड समितीने संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुंबईत २२ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा महिलांचा सामना होणार आहे. भारतीय महिलांनी न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली होती.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारताच्या अध्यक्षीय एकादश संघाचीदेखील घोषणा केली. हा सराव सामना १८ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

भारतीय महिलांचा संघ

मिताली राज (कर्णधार), झुलन गोस्वामी, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, दीप्ती  शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), आर. कल्पना, मोना मेश्राम, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, शिखा पांडे, मानसी जोशी, पूनम राऊत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian womens team announced for the series against england
First published on: 10-02-2019 at 01:27 IST