India’s Neeraj Chopra won the gold medal and Kishore Jena won the silver medal in the javelin event: १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अकराव्या दिवशी भारतीय भालापेकपटूंनी शानदार कामगिरी केली. भालाफेक स्पर्धेत भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने सुवर्णपदक तर किशोर जेनाने रौप्यपदक पटकावले आहे. भालाफेकमध्ये भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारताचा अनुभवी खेळाडू नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या ७८ झाली आहे. त्याचबरोबर भारताचे हे १७ वे सुवर्णपदक आहे. वास्तविक, जेना किशोरने नीरज चोप्राला तगडी स्पर्धा दिली. एकेकाळी नीरज चोप्रा जेना किशोरच्या मागे पडला होता, पण त्यानंतर नीरज चोप्राने जबरदस्त कमबॅक केले. विशेषत: नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटर फेक केली. जेना किशोरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अशा प्रकारे भालाफेकमधील सुवर्णपदक आणि रौप्यपदक दोन्ही भारताच्या वाट्याला गेले.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ

अशी होती गोल्डन बॉय नीरज चोप्राची कामगिरी –

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८२.३८ मीटर भालाफेक केली. यानंतर भारतीय अनुभवी खेळाडूने दुसऱ्या प्रयत्नात ८४.४९ मीटरचे अंतर कापले. यापूर्वी नीरज चोप्राचा प्रयत्न तांत्रिक बिघाडामुळे अवैध ठरला होता. जेना किशोरबद्दल सांगायचे तर या खेळाडूने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. अशाप्रकारे भारताला भालाफेकमध्ये सुवर्णपदक आणि रौप्यपदक मिळालं.

हेही वाचा – Rankings Announced: आयसीसी क्रमवारीत मोठा बदल; सिराज आणि शुबमनचे नुकसान, तर बाबर आझमला झाला फायदा

जेना किशोरने जिंकले रौप्यपदक –

भारतासाठी रौप्यपदक जिंकणाऱ्या जेना किशोरने पहिल्याच प्रयत्नात ८१.२६ मीटर भालाफेक केली. यानंतर त्याने दुसऱ्यामध्ये ७९.७६ मीटर भाला फेकला, तर जेना किशोरने तिसऱ्या प्रयत्नात ८६.७७ मीटर भाला फेकला. या खेळाडूने नीरज चोप्राला सातत्याने तगडी स्पर्धा ददिली. पण नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात पुनरागमन केले. यानंतर नीरज चोप्राने मागे वळून पाहिले नाही. याआधी नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. अशाप्रकारे नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे.