महेश भूपतीच्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगच्या तिकिटांचा तपशील जाहीर झाला असून, दिल्लीत होणाऱ्या तीनदिवसीय क्रीडामैफलीचे किमान तिकीट ३,२४० रुपये तर सर्वाधिक तिकीट ४९,६८० रुपये असणार आहे. इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये टेनिस लीगचा भारतातील टप्पा रंगणार असून या तीन दिवसांत टेनिसरसिकांना रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रस, सेरेना विल्यम्स, नोव्हाक जोकोव्हिच या दिग्गजांचा खेळ पाहण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे. ६६६.ु‘े८२ँ६.ूे या संकेतस्थळावर पहिल्या टप्प्यात ६००० तिकिटे उपलब्ध होणार आहेत. प्रीमियम वर्ग (ऑन कोर्ट) ४९,६८० तर प्रीमियम वर्ग (ऑफ कोर्ट) २९,१६० रुपयांना उपलब्ध असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International premier tennis league announces india ticket rates
First published on: 31-10-2014 at 07:35 IST