डेव्हिड वॉर्नरने सनराईजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी संघ व्यवस्थापनाने इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सला आपल्या संघात समाविष्ट केलं आहे. उपलब्ध खेळाडूंच्या यादीतून हैदराबादने १ कोटी रुपयांची किंमत मोजत हेल्सला वॉर्नच्या जागी पर्याय म्हणून संघात दाखल करुन घेतलं आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर वॉर्नरने हैदराबादच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – कसोटी क्रिकेटसाठी श्रीलंकन खेळाडूने नाकारली आयपीएलची ऑफर, हैदराबादकडून खेळण्यास दिला नकार

सनराईजर्स हैदराबाद संघाने अॅलेक्स हेल्सच्या निवडीची बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितली आहे.

याआधी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने आयपीएलचं विजेतेपद मिळवलं होतं. वॉर्नरसोबत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथनेही राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

अवश्य वाचा – आयपीएलमध्ये बोली नाही, भारताचा ‘हा’ खेळाडू आता प्रशिक्षकाची भूमिका बजावणार

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 srh named alex hales as a replacement of david warner
First published on: 31-03-2018 at 14:26 IST