scorecardresearch

Premium

आयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…

२०२१ स्पर्धेत शिखर धवन चांगल्याच फॉर्मात आहे. दिल्लीकडून खेळणाऱ्या शिखर धवनकडे ऑरेंज कॅप आहे.

Shikhar-Dhawan
आयपीएलमधील खेळीबाबत शिखर धवनचा खुलासा; म्हणाला, मागच्या २-३ वर्षात…(Photo- iplt20.com)

आयपीएल २०२१ स्पर्धेत शिखर धवन चांगल्या फॉर्मात आहे. दिल्लीकडून खेळणाऱ्या शिखर धवनकडे ऑरेंज कॅप आहे. मागच्या ८ सामन्यात त्याने ३८० धावा केल्या होत्या. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही त्याने लय कायम ठेवली आहे. यासाठी त्याने खास मेहनत घेतली आहे. मागच्या तीन आयपीएल सीझनमध्ये स्ट्राईक रेटवर लक्ष्य केंद्रीत केल्याचं त्याने सांगितलं आहे. सनराईजर्स हैदराबादविरुद्ध खेळताना शिखर धवनच्या आयपीएल २०२१ स्पर्धेत ४०० धावा पूर्ण झाल्या आहेत. शिखर धवनने ३७ चेंडूत ४२ धावा केल्या. यात ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. राशीद खानच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात सीमारेषेवर अब्दुल समादने त्याचा झेल पकडला.

२००८ ते २०१७ पर्यंत आयपीएल सीझनमध्ये शिखर धवनचा स्ट्राईक रेट १३० च्या खाली होता. पण २०१८ मध्ये त्याने १३६.९१ च्या स्ट्राईक रेटने ४९७ धावा केल्या. त्यानंतर त्याचा स्ट्राईक रेट पुन्हा खाली आला. पण २०२० आयपीएल स्पर्धेत चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्याने १४४.७३ च्या सरासरीने धावा केल्या. २०१९ आणि २०२० स्पर्धेत डावखुऱ्या धवननं ५०० हून अधिक धावा केल्या. “मागच्या दोन तीन वर्षात मी माझ्या स्ट्राईक रेटवर लक्ष्य केंद्रीत केलं होतं. कारण मला माहिती आहे की अजून खूप खेळायचं आहे. त्यामुळे कामगिरी चांगली असणं गरजेचं आहे. तुम्ही बघितलं असेल माझा स्कोरिंग रेट १३० च्या जवळ होता. आता तो १४५ च्या जवळ आहे. मी आता जोखीम घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे माझ्या संघासाठी चांगल्या धावा करत आहे”, असं शिखर धवननं स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या संघाने चांगली कामगिरी केली. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने ८ पैकी ७ सामन्यात विजय मिळवला आहे. “आम्ही पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. मात्र आता आम्ही पुन्हा एकदा सज्ज आहोत. आम्ही त्या लयीमध्येच खेळू”, असं शिखर धवनने पुढे सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2021 shikhar dhawan on batting strike rate says rmt

First published on: 22-09-2021 at 22:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×