Hasan Ali on IPL 2024: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली म्हणाला की, “जर संधी मिळाली तर मला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळण्याची इच्छा आहे.” २००८ मध्ये शोएब अख्तर, मोहम्मद हाफीज, सलमान बट, कामरान अकमल, सोहेल तन्वीर आणि इतर अनेक पाकिस्तानी खेळाडू आयपीएल खेळले आहेत. मात्र, दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे २००९ पासून पाकिस्तानी खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. अलीकडेच भारतीय भूमीवर २०२३चा विश्वचषक खेळलेल्या हसन अलीने आयपीएलला जगातील सर्वात मोठ्या लीग असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानी गोलंदाजाला आयपीएल खेळायचे आहे

हसन अली पाकिस्तानच्या समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “प्रत्येक खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा असते आणि मला देखील या लीगमध्ये खेळायचे आहे. ही जगातील सर्वात मोठ्या लीगंपैकी एक लीग असून भविष्यात जर मला संधी मिळाली तर मी तिथे नक्कीच खेळेन.” त्याचे हे विधान सध्या सोशल मीडियात खूप चर्चेत आहे.”

Pakistan Cricket Board Appoint Gary Kirsten as T20 Format Coach T20 World Cup 2024
T20 WC पूर्वी, पाकिस्तानची मोठी खेळी; भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती
Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात

हसन अलीने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती, जिथे त्याने सहा सामन्यांमध्ये ६.२९च्या सरासरीने नऊ विकेट्स घेतल्या, त्यात चार विकेट्सचा समावेश होता. आशिया चषक २०२३ सुपर-४मधील भारताविरुद्ध कोलंबो येथे झालेल्या सामन्यात नसीम शाहच्या घोट्याला दुखापत झाल्यानंतर हसनने विश्वचषकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पेशावर झाल्मी आणि नंतर इस्लामाबाद युनायटेडकडून खेळताना हसन अली पाकिस्तान सुपर लीगमध्ये यशस्वी ठरला आहे.

हेही वाचा: IND vs AUS: मालिका गमावण्याच्या भीतीने ऑस्ट्रेलियाने केले संघात सहा बदल, जाणून घ्या प्लेईंग इलेव्हन

पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो सध्या वहाब रियाझनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ७२ सामन्यांत ९४ विकेट्स घेतल्यामुळे, हसन १०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा पीएसएल इतिहासातील दुसरा गोलंदाज होण्यासाठी सहा विकेट्स कमी आहेत.

मुंबई हल्ल्याने दरवाजे बंद केले

नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग उघड झाल्यानंतर भारताने शेजारी देशाबरोबरचे सर्व संबंध संपवले. पाकिस्तानबरोबरचे भारताचे संबंध हे चर्चेपासून व्यापारापर्यंत सर्व काही जवळपास ठप्प आहे. यापार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना विरोध करण्यात आला होता, त्यानंतर आयपीएल समितीला पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएल खेळण्यावर बंदी घालावी लागली होती. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळता आलेले नाही.

हेही वाचा: IPL 2024: जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स सोडणार? सोशल मीडियावर एमआयला केले ‘अनफॉलो’, इन्स्टा स्टोरी व्हायरल

हसन अली हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघाचा भाग आहे

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाकिस्तानला जाणाऱ्या कसोटी संघात हसन अलीचा समावेश करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबरला तो ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. सध्या तो पाकिस्तान संघाच्या सराव शिबिरात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीच्या उद्देशाने हे शिबिर सुरू करण्यात आले आहे.