इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL 2020 ही स्पर्धा २९ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतला अंतिम सामना म्हणजेच फायनल मॅच २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची उपस्थिती होती. तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. IPL 2020 मध्ये फक्त पाच दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तर डे-नाईट सामना ८ वाजता सुरु होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान मुंबईला मिळालेला आहे. सोमवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आला. याचसोबत बैठकीत सामन्यांची वेळ रात्री ८ हीच कायम ठेवण्यात आलेली आहे. काही संघमालकांनी सामने रात्री साडेसात वाजता सुरु करावे अशी मागणी केली होती, मात्र बैठकीत वेळेत कोणताही बदल न करण्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.

याचसोबत Double Header सामन्यांची संख्याही यंदाच्या हंगामात कमी करण्यात आलेली असून, या हंगामात केवळ ५ Double Header सामने होतील. “आयपीएल सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. आधीप्रमाणेच सामने रात्री ८ वाजता सुरु होतील. रात्री साडेसात वाजता सामने सुरु करण्याबद्दल चर्चा झाली, पण त्यावर एकमत झालेलं नाही. आयपीएलचा अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत खेळवला जाईल, आणि यंदाच्या हंगामात केवळ ५ Double Header सामने असतील.” बीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पत्रकारांना माहिती दिली.

 

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl final in mumbai on may 24 night matches at 8 pm scj
First published on: 27-01-2020 at 19:17 IST