Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Match Updates : आयपीएल २०२४ मधील १९ वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामात आरसीबी आपला पाचवा सामना खेळणार आहे, तर राजस्थान चौथा सामना खेळणार आहे. राजस्थानने आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. त्याचवेळी आरसीबीने चारपैकी केवळ एका सामन्यात विजयाची चव चाखली आहे. दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी आणि खेळपट्टीचा अहवाल कसा आहे, जाणून घेऊया.

खेळपट्टीचा अहवाल –

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त ठरली आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांचा चेंडूशी चांगला संपर्क असतो. या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे आणि दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करणे संघांसाठी फायदेशीर आहे. या खेळपट्टीवर आतापर्यंत ५४ आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यापैकी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी ३४ सामने जिंकले आहेत. पहिल्या डावाची सरासरी १६० धावा आहे. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने दोनदा १९७ धावा केल्या आहेत.

IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

हवामान कसे असेल?

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना सुरू होईल, तेव्हा जयपूरमधील तापमान ३२ अंशांच्या आसपास असेल. मात्र, सामना संपेपर्यंत घसरण दिसून येऊ शकते. तापमान २७ अंशांपर्यंत पोहोचू शकते. पावसाची शक्यता नाही आणि आर्द्रता ३१ टक्के राहील.

हेही वाचा – World Cup 2024 : टी-२० विश्वचषकापूर्वी ‘या’ संघाच्या वाढल्या अडचणी, कर्णधारासह दोन खेळाडूंचा झाला कार अपघात

आरसीबी आणि आरआरची हेड टू हेड आकडेवारी –

आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ३० सामन्यात आमनेसामने आले आहेत. ज्यापैकी १५ सामन्यात आरसीबीने, तर १२ सामन्यात आरसीबीने बाजी मारली आहे. त्याबरोबर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही.

दोन्ही संघांना टॉप ऑर्डरची चिंता –

आरसीबीप्रमाणे राजस्थानलाही त्यांच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांच्या खराब फॉर्मची चिंता आहे. रजत पाटीदारने लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध २९ धावा केल्या होत्या, पण त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी आरसीबीच्या होम ग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमसारखीच आहे. ज्यावर फलंदाजांना फटके खेळणे सोपे जाईल. दुसरीकडे, रॉयल्सचे सलामीवीर जैस्वाल आणि बटलर चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत. यशस्वी आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आला होता, पण तीन सामन्यांत त्याला केवळ ३९ धावा करता आल्या आहेत. तीच गोष्ट बटलरची आहरे. इंग्लंडच्या टी-२० कर्णधाराने तीन सामन्यांत ३५ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट ८५ आहे.

हेही वाचा – IPL तिकीट ऑनलाइन खरेदी करताना महिलेला ‘ही’ एक चूक पडली महागात; झाली हजारो रुपयांची फसवणूक

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, आवेश खान.

हेही वाचा – IPL 2024, RCB VS RR: बंगळूरुची कोहलीवर भिस्त

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश दयाल, मयंक डागर, रीस टॉप्ले.