आयपीएलच्या ११ व्या हंगामात बरेच युवा खेळाडू चमकत असल्यातं पाहायला मिळत आहे. यातीलच एक नाव म्हणजे लोकेश राहुल. यंदाच्या आयपीएलमध्ये लोकेश राहुलची अफलातून खेळी क्रीडारसिकांची मनं जिंकत आहे. मंगळवारी म्हणजे ८ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने बिनबाद ९५ धावा केल्या. मात्र या सामन्याच त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे पंजाबच्या संघाला तो यश मिळवून देऊ शकला नाही. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या पंजाबच्या संघाने राजस्थान रॉयल्ससोबतचा हा सामना अवघ्या १५ धावांनी गमावला. पण, या सामन्यात राहुलची खेळी खऱ्या अर्थाने सुपरहिट ठरली.
एकंदरच यंदाच्या आयपीएलमध्ये राहुलचं प्रदर्शन पाहता त्याच्या खेळीवर पाकिस्तानी अँकर फिदा झाली आहे. मुख्य म्हणजे राहुलच्या लोकप्रियतेचा आढावा घेता त्याच्या चाहत्याच्या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, असंच म्हणावं लागेल. झैनब अब्बास असं त्या पाकिस्तानी अँकरचं नाव असून, तिने ट्विट करत राहुलच्या खेळाची प्रशंसा केली आहे. ‘उत्तम आणि प्रभावी खेळी, खेळात अचूकपणे साधलेली वेळ आणि त्याचं प्रदर्शन पाहून मजा आली के.एल राहुल…’, असं ट्विट तिने केलं. तिचं हे ट्विट क्षणार्धात बरंच व्हायरल झालं असून भारतात त्याची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.
वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये
KL Rahul impressive,superb timing,great to watch.. #RRvKXIP
— zainab abbas (@ZAbbasOfficial) May 6, 2018
वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट
कोण आहे झैनब अब्बास?
झैनब अब्बास ही पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकर असून, बरीच लोकप्रियही आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये केल्या जाणाऱ्या अँकरिंगसाठी ती प्रामुख्याने ओळखली जाते. त्याशिवाय सोशल मीडियावरही तिची बरीच लोकप्रियता पाहायला मिळातेय.
