RCB vs KKR Match Updates : आयपीएलच्या १७व्या हंगामातील १०वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. आरसीबी आणि केकेआर या दोन्ही संघांनी त्यांचे मागील सामने जिंकले आहेत, परंतु आरसीबीला घरच्या मैदानावर खेळण्याचा नेहमीच फायदा होतो, त्यामुळे विजयाची मालिका कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तथापि, आरसीबीला या सामन्यात केकेआरकडून कडव्या प्रतिस्पर्ध्याला सामोरे जावे लागेल, ज्यांच्याकडे फलंदाजीही चांगली आहे.

कोणाचे पारडे जड?

आरसीबी आणि केकेआर दोन्ही संघ आयपीएलच्या ३२ सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये केकेआरचा वरचष्मा राहिला आहे. गेल्या पाच सामन्यांमध्येही कोलकाताने आरसीबीविरुद्ध पाचपैकी चार सामने जिंकून विक्रम कायम ठेवला आहे. आतापर्यंत केकेआरने १८ आणि आरसीबीने १४ सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीर कोलकाता संघाचा मेंटॉर म्हणून पुन्हा संघाशी जोडला गेला आहे. त्यामुळे गंभीर आणि कोहलीच्या संघांतील हा सामना नक्कीच रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे.

आरसीबीला कोहलीकडून पुन्हा आशा –

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहलीकडून त्याच्या संघाला पुन्हा एकदा आशा असतील. आरसीबीचा माजी कर्णधार कोहलीने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते, त्याच्या जोरावर संघ लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरला होता. कोहलीकडे मोठी भागीदारी उभारण्याची क्षमता आहे. त्याने आयपीएलमध्ये सात वेळा १५० किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली आहे. कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिसची जोडीही आयपीएलमध्ये धमाकेदार असून केकेआरच्या गोलंदाजांसमोर आरसीबीच्या या सलामीच्या जोडीला रोखण्याचे आव्हान असेल. त्याचबरोबर आरसीबीसमोर केकेआरचे रसेल वादळ रोखण्याचे आव्हान असणार आहे.

हेही वाचा – IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रिकी पाँटिंगने पंचाशी घातला वाद, काय होतं कारण? जाणून घ्या

बंगळुरूमधील हवामान कसे असणार?

आरसीबी आणि केकेआर यांच्यातील या सामन्यात पाऊस कोणताही अडथळा निर्माण करू शकणार नाही. कारण शुक्रवारी हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. या काळात तापमान २२ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. खेळपट्टीबद्दल बोलायचे तर ते फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल आणि येथील लहान सीमारेषा फलंदाजांना अतिरिक्त मदत करेल.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

आरसीबी: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, दिनेश कार्तिक, आकाश दीप, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, स्वप्नील सिंग, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, विल जॅक, कॅमेरुन ग्रीन.

हेही वाचा – MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

केकेआर : फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, आरोन वरुण, हर्षित राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल.