राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात आरसीबीचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक कोहलीच्या बॅटमधून पाहायला मिळाले. विराटने ७२ चेंडूत ४ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने ११३ धावा करत नाबाद परतला. विराटच्या शतकी कामगिरीच्या जोरावर बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १८३ धावा केल्या. या सामन्यातील विराट-चहलचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. बेंगळुरूने सामन्यात ३ गडी गमावून १८३ धावा केल्या. विराटच्या या शतकी खेळीदरम्यान एक प्रसंग असा घडला, की विराट कोहलीने युझवेंद्र चहलला कानशिलात लगावू का, अशी मजेशीर अॅक्शन करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. कोहलीसमोर युझवेंद्र चहल गोलंदाजी करत असतानाचा हा प्रसंग आहे. यादरम्यान, कोहली ९२ धावांवर फलंदाजी करत असताना, चहलच्या गोलंदाजीवर त्याने एक शानदार षटकार लगावला. या षटकारासह कोहलीने ९८ धावांचा टप्पा गाठला. हा षटकार मारल्यानंतरच कोहलीने चहलकडे पाहत असे हावभाव केले. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

या व्हीडिओमध्ये विराट चहलला अॅक्शन करून दाखवताना हसत नव्हता त्यामुळे नेमकं काय वातावरण आहे असा अनेकांना प्रश्न पडला होता. पण विराट आणि चहल हे चांगले मित्र असून हा फक्त मजा, मस्ती करणारा प्रसंग असू शकतो. या सामन्यात २ विकेट्स घेत शानदार कामगिरी करणाऱ्या चहलने पर्पल कॅप आपल्या नावे केली. सामन्यानंतर त्याला विराटने पर्पल कॅपही दिली. सामन्याआधी देखील विराट आणि चहलचा एक व्हीडिओ समोर आलेला ज्यात हे दोघे एकमेकांशी गप्पा करत मस्ती करताना दिसले होते.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात राजस्थान संघाने बाजी मारली. तर राजस्थानने जॉस बटलरच्या शतकाच्या जोरावर या सामन्यात ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला असून, हा आयपीएलच्या या मोसमातील त्यांचा सलग चौथा विजय आहे. तर IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत चार सामने गमावले आहेत.