किंग्ज XI पंजाब आणि हैदराबाद सनरायजर्स या दोन संघांचा सामना सुरु आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलने ५८ चेंडूंमध्ये ११ षटकार आणि १ चौकार लगावत मोसमातले पहिले शतक झळकावले. ख्रिस गेलची ही खेळी किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. पहिल्या मॅच पासून सोळाव्या मॅचपर्यंत एकाही खेळाडूने शतक झळकावले नाही. मात्र आजच्या सामन्यात ख्रिस गेलची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळताना शतक झळकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्रिस गेल हा त्याच्या आक्रमक आणि धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध आहे आज त्याच्याच खेळीचे दर्शन मोहालीच्या मैदानात घडले. लोकेश राहुलची विकेट गेल्यावर ख्रिस गेलने नाबाद १०४ धावांची खेळी केली आहे. ६३ चेंडूत ११ षटकार आणि १ चौकार मारत ख्रिस गेलने १०४ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळेच किंग्ज इलेव्हन पंजाबला १९३ धावांचा डोंगर रचता आला. ख्रिस गेलने डोळ्याचे पारणे फेडणारी खेळी करत क्रिकेट रसिकांना अनोखा आनंद दिला.

Web Title: Ipl 2018 power packed century by khris gyle in kxip inning at mohali
First published on: 19-04-2018 at 21:56 IST