फॉर्म गमावून बसलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी मंगळवारचा दिवस चांगला ठरला. सनराईजर्स हैदराबादवर २० धावांनी मात करत चेन्नईने या हंगामातला आपला तिसरा विजय नोंदवला. यंदा गुणतालिकेत अखेरच्या स्थानांवर फेकल्या गेलेल्या चेन्नईसाठी प्ले-ऑफची शर्यत आता कठीण होऊन बसली आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपरकिंग्जने १६७ धावा केल्या. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही चेन्नईने नवा प्रयोग करत फाफ डु-प्लेसिससोबत युवा सॅम करनला सलामीला फलंदाजीसाठी पाठवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॅम करनने २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावा केल्या, मात्र दूसऱ्या बाजूने फाफ डु-प्लेसिसच्या बाबतीत नकोसा योगायोग जुळून आला. तब्बल ६ वर्षांनी फाफ डु-प्लेसिस आयपीएलमध्ये शून्यावर बाद झाला होता. २०१४ सालच्या हंगामात डु-प्लेसिस हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळतानाच शून्यावर बाद झाला होता. यानंतर थेट सहा वर्षांनी त्याला हैदराबादविरुद्धच एकही धाव न करता माघारी परतावं लागलं. आयपीएलच्या इतिहासात डु-प्लेसिस आतापर्यंत फक्त ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

संदीप शर्माने यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी डु-प्लेसिसला झेलबाद केलं. दरम्यान १६८ धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ कोलमडला. केन विल्यमसनच्या ५७ धावांचा अपवाद वगळता एकही फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही आणि २० धावांनी चेन्नईने सामन्यात बाजी मारली.

Web Title: Csk vs srh faf du plessis out for a duck for first time since 2014 psd
First published on: 14-10-2020 at 14:33 IST