IPL 2020 मधील अतिशय रोमांचक अशा सामन्यात कोलकाताने पंजाबला शेवटच्या चेंडूवर २ धावांनी पराभूत केले होते. पंजाबला शेवटच्या चेंडूवर सामना सुपरओव्हरमध्ये नेण्यासाठी षटकाराची गरज होती, पण अवघ्या एका इंचाने चेंडू सीमारेषेनजीक पडला आणि पंजाबला केवळ चारच धावा मिळाल्या. या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती सुनील नरिनने. त्याने शेवटच्या षटकात टप्प्यावर गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता. पण त्यानंतर नरिनला गोलंदाजीच्या शैलीमुळे धक्का बसला होता. त्यानंतर रविवारी हैदराबादच्या सामन्याआधी KKRला दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील नरिनने शेवटच्या षटकात शिस्तबद्ध गोलंदाजी करत कोलकाताला विजय मिळवून दिला होता. पण सामना संपल्यानंतर सुनील नरिनची गोलंदाजीची शैली ही संशयास्पद असल्याचं निरीक्षण मैदानावरील पंचांनी नोंदवलं. सामन्यात सुनील नरिनच्या गोलंदाजीची शैली ही आक्षेपार्ह असल्याचा अहवाल पंचांनी दिली असल्याचे BCCIने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. संशयास्पद गोलंदाजी शेलीबाबतच्या नियमांचा आधार घेतच हा आक्षेप नोंदवण्यात आला होता. परंतु नुकतेच सुनील नरिनला गोलंदाजी शैलीबाबत हिरवा कंदील मिळाला आहे.

“गोलंदाजी नियमन समितीकडे सुनील नरिनच्या गोलंदाजीची अधिकृरित्या चाचणी करण्यात यावी अशी विनंती कोलकाताने केली होती. सुनील नरिनच्या गोलंदाजीच्या शैलीचा तपशीलवार व्हिडीओ या समितीकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यानंतर समितीने योग्य पद्धतीने शैली अभ्यास करत त्याची शैली वैध ठरवली आहे”, असे IPL कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, शैली आक्षेपार्ह असल्याच्या तक्रारीनंतर नियमानुसार सुनील नरिनचं नाव ‘वॉर्निंग लिस्ट’मध्ये टाकण्यात आलं होतं. ते नावंही त्यातून काढण्यात आलं आहे.

Web Title: Ipl 2020 big relief for kkr sunil narine bowling action cleared name removed from warning list vjb
First published on: 18-10-2020 at 14:26 IST