कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या ‘आयपीएल’ सामन्यात क्षेत्ररक्षण करताना लाळेचा वापर केल्यामुळे  राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रॉबिन उथप्पा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने ‘आयसीसी’च्या कोविड-१९ शिष्टाचारांचे उल्लंघन केले आहे. सामन्याच्या तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर सुनील नरिनने मारलेला उत्तुंग फटक्यावरील झेल उथप्पाने सोडला. त्यानंतर चेंडू उचलून त्याने लाळेचा वापर के ल्याचे दिसून आले. त्यामुळे समाजमाध्यमांवर या व्हिडीओची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी ‘आयपीएल’ प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. जून महिन्यापासून ‘आयसीसी’ने लागू केलेल्या नियमांनुसार लाळेचा वापर निषिद्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uthappa who uses saliva is in the midst of controversy abn
First published on: 02-10-2020 at 00:22 IST