हैदराबादविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या. चेन्नईच्या डावाची सुरूवात खराब झाली होती, पण मधल्या षटकांमध्ये शेन वॉटसन आणि अंबाती रायडू या अनुभवी जोडीने केलेल्या ८१ धावांच्या भागीदारीमुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली. जाडेजाने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत संघाला १६०च्या पार मजल मारून दिली. हैदराबादकडून फिरकी गोलंदाजांना यश मिळाले नाही पण वेगवान गोलंदाजांनी मात्र प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्यात धोनी फलंदाजी करत असताना गोलंदाजाकडून अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा पेश करण्यात आला. संदीप शर्मा १८व्या षटकात गोलंदाजी करत होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर धोनीने समोरच्या दिशेने फटका मारला. चेंडू सरळ रेषेत जात असतानाच संदीप शर्माने अप्रतिम अशी झेप घेत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. झेल त्याच्या हातून सुटला पण त्याने केलेल्या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं.

दरम्यान, नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्पर्धेत पहिल्यांदा CSKला आधी फलंदाजीची संधी मिळाली. नियमित सलामीवीर फाफ डु प्लेसिससोबत आजच्या सामन्यात सॅम करनला पाठवण्यात आलं. डु प्लेसिस शून्यावर बाद झाला. सॅम करनने फटकेबाजी केली, पण त्याला संदीप शर्माने ३१ धावांवर त्रिफळाचीत केला. त्यानंतर शेन वॉटसन आणि रायडु यांनी डाव सावरत ८१ धावांची भागीदारी केली. पण दोघांनाही अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. वॉटसन ४२ तर रायडू ४१ धावांवर माघारी परतला.

धोनीने २ चौकार आणि १ षटकार खेचत थोडी चमक दाखवली होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो २१ धावांवर बाद झाला. पण रविंद्र जाडेजाने शेवटपर्यंत तळ ठोकत १० चेंडूत नाबाद २५ धावा कुटल्या आणि चेन्नईला १६७ धावांपर्यंत मजल मारून दिली. हैदराबादकडून संदीप शर्मा, नटराजन आणि खलील अहमद यांना २-२ बळी मिळाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch ms dhoni shot stopped bowler sandeep sharma by dive in the air superb fielding video ipl 2020 srh vs csk vjb
First published on: 13-10-2020 at 22:23 IST