आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच युएईत पार पडला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. मुंबई व्यतिरीक्त तेराव्या हंगामात पंजाब आणि हैदराबादच्या संघानेही आश्वासक खेळ केला. उपांत्य फेरीत दिल्लीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे हैदराबादला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही. पण केन विल्यमसनने अखेरच्या काही सामन्यांमध्ये धडाकेबाज खेळी करत आपलं महत्व सिद्ध केलं. २०२१ साली एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या हंगामाचं आयोजन भारतातच करण्याचा BCCI चा विचार आहे. यासाठी Mega Auction करण्याचेही संकेत मिळत आहेत. मेगा ऑक्शन झाल्यास सर्व संघांना आपले खेळाडू लिलावासाठी उतरवावे लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असं झाल्यास हैदराबादचा संघ केन विल्यमसनची सोथ सोडणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतू कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही विल्यमसनला गमावणार नाही म्हणत सूचक संकेत दिले आहेत.

२०१८ साली झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये हैदराबादच्या संघाने विल्यमसनवर ३ कोटींची बोली लावली होती. पुढील हंगामासाठी लिलावाकरता हैदराबादने विल्यमसनला सोडलं तरीही Right to match कार्डाद्वारे ते परत त्याला संघात स्थान देतील. २०१८ च्या हंगामात ७३५ धावांसह ऑरेंज कॅप मिळवणाऱ्या विल्यमसनला २०१९ च्या हंगामात मात्र त्याला आपला प्रभाव पाडता आला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत विल्यमसनने हैदराबादच्या संघाचं प्रतिनिधीत्वही केलं आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will not lose him david warner hints srh will retain kane williamson if theres a mega auction next year psd
First published on: 15-11-2020 at 09:27 IST