आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ युएईत दाखल झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली CSK चा संघ यंदाच्या हंगामात विजेतेपदासाठी सज्ज झाला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत तीन विजेतेपदं मिळवली आहेत. परंतू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता आयपीएलमध्ये धोनी काय करणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे. पुढचे काही हंगाम धोनी चेन्नईकडून खेळणार असल्याचं त्याने स्पष्ट केलंय. पण धोनीनंतर चेन्नईचं कर्णधारपद कोणाकडे जाणार?? हा प्रश्न अनेक चाहत्यांसमोर आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने याचं उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राव्होच्या मते पुढील काही वर्षांत धोनी चेन्नईचं कर्णधारपद कोणाकडे जाईल हे ठरवेल. “गेल्या काही वर्षांपासून हा विषय त्याच्या डोक्यात आहे. आमच्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी निवृत्त व्हायचं आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत धोनी निवृत्त होऊन रैना किंवा इतर कोणत्यातरी तरुण खेळाडूकडे संघाचं नेतृत्व सोपवेल. तुलनेने आता त्याच्यावरचा दबाव कमी झाला असेल. त्याला आता फक्त चेन्नईपुरता विचार करायचा आहे.” ब्राव्हो एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

दरम्यान CSK संघातील करोनाग्रस्त सदस्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा खेळाडूंनी बाहेर येऊन सरावाला सुरुवात केली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : रैना CSK मध्ये पुनरागमन करु शकतो !

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will be csks next captain its been in the back of ms dhonis mind says bravo psd
First published on: 06-09-2020 at 15:53 IST