यजुवेंद्र चहलच्या फिरकीपुढे हैदराबादचे एकपेक्षा एक महान स्पेशल अपयशी ठरले. चहलच्या गोलंदाजीमुळे आरसीबीने हैदराबादचा १० धावांनी पराभव केला. चहलने आपल्या चार षटकांत फक्त १८ धावा देत ३ बळी घेतले. यापैकी दोन विकेट १६ व्या षटकांत घेत सामना फिरवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१६ व्या षटकात धोकादायक ठरणाऱ्या जॉनी बायोस्टोला क्लीनबोल्ड करत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विजय शंकरला फिरकीच्या जाळ्यात अडकवत लगेच माघारी पाठवलं. दोन चेंडूवर दोन बळी घेत हैदराबादला बॅकफूटवर आणलं.

दमदार सुरुवातीनंतर हैदराबाद संघाला सामना गमावावा लागला. अखेरच्या चार षटकांत हैदराबाद संघानं ८ विकेट गमावल्या आहेत. १२ व्या षटकांतील अखेरच्या चेंडूवर चहलने मनिष पांडेला बाद केलं होतं. हैदराबादची ही दुसरी विकेट होती. युवा गर्ग आणि बायस्टो चांगली फलंदाजी करत होते. मात्र पुन्हा एकदा चहलने हैदराबादला धक्का दिला. १६ व्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर बायस्टो आणि विजय शंकरला माघारी पाठवलं. चहलच्या चार षटकांत सामन्याचं चित्र पालटलं अन् हरता हरता आरसीबीनं सामना जिंकला.

मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे हैदराबादला हातात आलेल्या सामन्यावर पाणी सोडावं लागलं आहे. बंगळुरुच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी हैदराबादच्या डावाला खिंडार पाडत सामन्यात दमदार पुनरागमन केलं. एका क्षणाला हातातून गमावलेला सामना बंगळुरुने १० धावांनी जिंकला. युजवेंद्र चहलने एकाच षटकात जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत बंगळुरुच्या विजयाची पायाभरणी केली. हैदराबादकडून बेअस्टोने धडाकेबाज अर्धशतक झळकावलं, पण त्याची खेळी व्यर्थ गेली.

बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार वॉर्नर धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्टो जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मैदानात स्थिरावल्यानंतर फटकेबाजी सुरुवात केली. पांडे-बेअरस्टो जोडी मैदानात चमत्कार घडवणार असं वाटत असतानाच पांडे माघारी परतला. यानंतरही बेअरस्टोने एक बाजू लावून धरत फटकेबाजी सुरु ठेवली. बंगळुरुच्या गोलंदाजांचा समाचार घेत बेअरस्टोने ४३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांनिशी ६१ धावा केल्या. युजवेंद्र चहलने एकाच षटकात बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत हैदराबादला धक्का दिला.

यानंतर हैदराबादच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीतला एकही फलंदाज मैदानावर फारसा स्थिरावू शकला नाही. अनेक फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकल्यामुळे बंगळुरुच्या संघाला विजय सोपा झाला. युजवेंद्र चहलने ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला नवदीप सैनी आणि शिवम दुबे यांनी २-२ तर स्टेनने १ बळी घेत चांगली साथ दिली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuzvendra chahal of royal challengers bangalore celebrates the wicket nck
First published on: 21-09-2020 at 23:56 IST