Chepauk Stadium become first venue to host 3 IPL finals : चेन्नईतील एमएस धोनीचे ‘होम ग्राउंड’ एमए चिदंबरम स्टेडियम आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यासह इतिहास रचला आहे. श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सध्याच्या आयपीएल हंगामातील विजेतेपदाची लढत आहे. या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्लेऑफसाठी पात्र ठरण्यातही यश आले नाही. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या सीएसकेला शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागल्याने प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले.

खरेतर, चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) हे सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यासह तीन आयपीएल फायनलचे आयोजन करणारे पहिले स्टेडियम ठरले आहे. चेपॉक या कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यासह तिसऱ्यादा आयपीएलच अंतिम सामना आयोजित करणारे पहिले स्टेडियम ठरल आहे. याआधी २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आणि २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने या स्टेडियमधवर सामना जिंकून ट्रॉफी जिंकली होती.

धोनीशिवाय चेन्नईत पहिल्यांदाच फायनल –

चेन्नई सुपर किंग्जच्या मैदानावर अंतिम सामना खेळला जात असताना आणि महेंद्रसिंग धोनी खेळत नसताना आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत आहे. २०११ आणि २०१२ मध्ये या मैदानावर जेतेपदाचे सामने झाले होते, ज्यामध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने दोन्ही वेळा भाग घेतला होता. चेन्नई सुपर किंग्जने २०११ मध्ये ट्रॉफी जिंकली होती. त्याचवेळी कोलकाता संघाने २०१२ च्या फायनलमध्ये चेन्नईचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

हेही वाचा – T20 WC 2024 : संजू सॅमसन टीम इंडियासह अमेरिकेला का गेला नाही? समोर आले मोठे कारण

केकेआरचा तिसऱ्यांदा तर एसआरएचा दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न –

दोन्ही फायनलच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हैदराबादने दोनदा आयपीएल फायनल खेळली आहे, ज्यात एक विजय आणि एक पराभव आहे. त्याचबरोबर केकेआरची ही चौथी आयपीएल फायनल आहे. याआधी झालेल्या तीन फायनलमध्ये दोनदा विजय तर एकदा पराभूत झाला आहे. दोन्ही संघ आपापल्या मागील अंतिम सामन्यात पराभूत झाले होते. तथापि, केकेआरचा चेन्नईमध्ये खेळण्याचा प्लस पॉईंट आहे की या मैदानावर सीएसकेचा पराभव करून संघ चॅम्पियन बनला आहे.