Shikhar Dhawan shoulder injury : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २७वा सामना शनिवारी महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर येथे खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवल ३ विकेट्सनी विजय मिळवला. ज्यामुळे पंजाब किंग्जला यंदाच्या हंगामातील आपल्या पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर पंजाब संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार शिखर धवनच्या खांद्याला दुखापती झाली असून तो पुढील ७ ते १० दिवस बाहेर राहणार आहे. याबाबत पंजाब किंग्जचे संचालक संजय बांगर यांनी संकेत दिले आहेत.

शिखर धवनच्या अनुपस्थितीत सॅम करनने राजस्थानविरुद्ध पंजाब किंग्जची कमान सांभाळली होती. धवनच्या दुखापतीबाबत पंजाब किंग्जचे संचालक संजय बांगर म्हणाले, “शिखर धवनच्या खांद्याला दुखापत झाली असून तो आणखी काही दिवस बाहेर राहणार आहे. शिखर धवनसारखा अनुभवी सलामीचा फलंदाज संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. उपचार कसे होतात हे पाहणे बाकी आहे. यावेळी तो किमान ७ ते १० दिवस खेळू शकणार नसल्याचे दिसते.”

Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

आयपीएल २०२४ मध्ये शिखर धवनची बॅटने कामगिरी चांगली राहीला नाही, त्याने पाच डावात ३०.४० च्या सरासरीने आणि १२५.६१ च्या स्ट्राईक रेटने १५२ धावा केल्या आहेत. पंजाब किंग्ज चालू मोसमात ६ सामन्यांत चार विजय मिळवून गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या

राजस्थान रॉयल्सने पाचवा सामना जिंकला –

सामन्याबद्दल बोलायचे तर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना खूपच रोमहर्षक झाला. ज्यामध्ये शिमरॉन हेटमायरच्या १० चेंडूत २७ धावांच्या नाबाद खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा एक चेंडू आणि ३ राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या १४ चेंडूंमध्ये ३० धावांची गरज होती, त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल (पाच चेंडूत ११ धावा) या वेस्ट इंडिजच्या फलंदाज जोडीने आक्रमक फलंदाजी करत राजस्थानला सहा सामन्यांतील पाचवा विजय मिळवून दिला.

हेही वाचा – KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या

पंजाब किंग्जचा फ्लॉप शो कायम –

‘प्लेअर ऑफ द मॅच’ शिमरॉन हेटमायरने आपल्या नाबाद खेळीत एक चौकार आणि तीन षटकार ठोकले. पंजाबला ८ बाद १४७ धावांवर रोखल्यानंतर राजस्थानने १९.५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा करून गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले. हेटमायरशिवाय यशस्वी जैस्वालनेही राजस्थानसाठी ३९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. ज्यामुळे पंजाब किंग्जला यंदाच्या हंगामातील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अशा प्रकारे पंजाब किंग्ज संघाचा यंदाच्या हंगामातील फ्लॉप शो कायम आहे.