LSG Changed Jersey Against KKR Match : आयपीएल २०२४ मधील २८वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि लखनऊ सुपरजायंट्स (एलएसजी) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊ संघाने या सामन्यासाठी विशेष बदल केला असून संघातील सदस्य कोलकात्याच्या प्रसिद्ध फुटबॉल क्लब मोहन बागानच्या रंगाची जर्सी घालून खेळायला आले आहेत.

एलएसजी संघ आणि मोहन बागान क्लब संजीव गोएंकांच्या मालकीचे –

लखनऊ सुपरजायंट्स आणि मोहन बागान क्लब हे प्रसिद्ध उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीचे आहेत. त्यामुळे कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यासाठी लखनऊने मोहन बागानच्या जर्सीच्या रंगाची जर्सी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी लखनऊचा संघ मरून आणि हिरवी जर्सी घालून आला आहे. मोहन बागानचीही याच रंगाची जर्सी आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयंक यादव आहे तरी कोण?
Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ मरून आणि हिरव्या जर्सीमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. लखनऊ संघ २०२३ मध्ये मोहन बागान क्लबच्या जर्सीच्या रंगाची जर्सी घालून या संघाविरुद्ध खेळला होता. गेल्या वर्षी लखनऊ संघ व्यवस्थापनाने मोहन बागानचा वारसा आणि भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यासाठी ही जर्सी घातल्याचे सांगितले होते.

हेही वाचा – Delhi Capitals : ऋषभ पंतच्या संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू अचानक IPL सोडून मायदेशी परतला

दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक –

कोलकाता आणि लखनऊच्या संघांना मागील सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. केकेआरने त्यांचे पहिले तीन सामने जिंकले होते, परंतु चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता, तर लखनऊला त्यांच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले होते. कोलकात्याच्या घरच्या मैदानावर लखनऊ स्वत:साठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा – PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल

आकडेवारीत केकेआरवर एलएसजीचे वर्चस्व –

आयपीएलच्या इतिहासातील या दोन संघांमधील आकडेवारी पाहिल्यास, लखनऊ सुपरजायंट्सचा कोलकातावर वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने झाले असून कोलकाता संघाला एकही विजय नोंदवता आलेला नाही. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघ ईडन गार्डन्सवर आमनेसामने आले होते, तेव्हा लखनऊ रोमांचक सामन्यात एका धावेने विजय मिळवला होता.