Ramandeep Singh Penalised For IPL Code of Conduct Breach : आयपीएल २०२४ मधील ६०वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला गेला. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे १६-१६ षटकांचा सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये कोलकाताने मुंबईवर १८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह कोलकातान संघ आयपीएल २०२४ मधील बाद फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी केकेआरने मुंबई इंडियन्ससमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १३९ धावांच करु शकला. या सामन्यानंतर बीसीसीआयच्या एका खेळाडूवर मोठी कारवाई केली आहे.
बीसीसीआयची केकेआरच्या खेळाडूवर कारवाई –
कोलकाता नाईट रायडर्सच्या रमणदीप सिंगला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. रमणदीपने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२० अंतर्गत लेव्हल एकचा गुन्हा केला आहे. अष्टपैलू खेळाडू रमणदीप सिंगने आपला गुन्हा आणि सामनाधिकारी यांनी सुनावलेली शिक्षा मान्य केली आहे. आचारसंहितेच्या स्तर एक भंगासाठी, सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. रमणदीप सिंगने या सामन्यात ७ चेंडूत नाबाद १७ धावांचे योगदान दिले.
केकेआर बाद फेरी गाठणारा पहिला संघ –
सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी गोलंदाजांच्या जोरावर केकेआरने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. मुंबई इंडियन्सच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर वेंकटेश अय्यरच्या २१ चेंडूत ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाताने ७ गडी बाद १५७ धावा केल्या होत्या. प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने ६.४ षटकांत बिनबाद ६५ धावा केल्या होत्या. पण स्टार फिरकीपटू सुनील नरेनने इशान किशनला (४०) बाद करुन संघाल पहिले यश मिळवून दिले.
हेही वाचा – IPL 2024 : कोलकाता प्लेऑफ्समध्ये; मुंबईवर दणदणीत विजयासह बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ
वरुण चक्रवर्ती ठरला ‘सामनावीर’
वरुण चक्रवर्तीने १७ धावांत दोन आणि रसेलने ३४ धावांत दोन बळी घेतले. यामुळे केकेआरने १३व्या षटकात मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परत पाठवला होता. यानंतर मुंबईला १६ षटकांत ८ गडी गमावून केवळ १३९ धावा करता आल्या. हर्षित राणाने ३४ धावांत दोन तर नरेनने २१ धावांत किशनची महत्त्वाची विकेट घेतली. अशाप्रकारे दोन वेळा विजेत्या केकेआरने दोन सामने शिल्लक असताना शेवटच्या प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले. वरुण चक्रवर्तीला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले.