यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. रोहित शर्माचे कर्णधारपद हार्दिक पंड्याला दिल्यापासूनच चर्चा जोर धरून आहेत. सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबईने दिल्लीविरूद्ध पहिला सामना जिंकला. वानखेडे मैदानावर आज ११ एप्रिलला मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत होणार आहे. पण तत्त्पूर्वी रोहित शर्मा आणि आकाश अंबानी कारमधून एकत्र प्रवास करत असल्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

रोहित शर्मा कारमध्ये मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांच्या शेजारी बसलेला दिसला. एमआयचा माजी कर्णधार रोहित पुढच्या प्रवासी सीटवर होता, तर आकाश कार चालवत असल्याचे दिसत आहे. आजच्या ब्लॉकबस्टर सामन्यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर गाडी थांबली होती. आकाश अंबानी आणि रोहित एकत्र वानखेडे स्टेडियमकडे निघाले होते. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये अनेक जण त्यांच्या कारभोवती फोटो व्हीडिओ काढायला जमले असल्याचेही दिसत आहे.

या व्हीडिओनंतर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पुन्हा मोठी घडामोड घडणार आहे का, अशा चर्चा आणि कमेंट्स सुरू झाल्या आहेत. मुंबईने सलग दुसरा सामना गमावल्यानंतर म्हणजेच हैदराबादविरूद्धच्या सामन्यानंतर आकाश अंबानी आणि रोहित शर्मा एकमेकांशी बराच वेळ चर्चा करताना दिसले होते. मुंबईच्या सलग तीन पराभवांनंतर रोहित शर्माकडे पु्न्हा कर्णधारपद दिले जाईल अशीही चर्चा रंगली होती.