Rohit Sharma completes 1000 runs against Delhi Capitals : आयपीएल २०२४ मधील २० वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या मुंबईच्या माजी कर्णधार रोहित शर्माचे अवघ्या एका धावेने अर्धशतक हुकले. मात्र, या दरम्यान रोहित शर्माने एक मोठा विक्रम केला. तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खास पराक्रम करणारा विराट कोहलीनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे.

रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हा पराक्रम करणारा दुसरा खेळाडू –

या मोसमात आतापर्यंत रोहित शर्माच्या बॅटमधून एकही मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. मात्र वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने २७ चेंडूचा सामना करताना ६ चौकार आणि ३ षटकार मारत ४९ धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो हा पराक्रम करणारा विराट कोहलीनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे, ज्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १००० पूर्ण केल्या आहेत. रोहितने आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध १०२६ धावा केल्या आहेत. याआधी फक्त विराट कोहलीने आयपीएलमध्ये दिल्ली संघाविरुद्ध १००० हून अधिक धावा केल्या होत्या. आता रोहित या यादीत सामील झाला आहे.

Eknath khadase and sharad pawar
“शरद पवारांचा मी ऋणी, संकटाच्या काळात मला…”, भाजपात परतणाऱ्या एकनाथ खडसेंचं विधान चर्चेत
According To Rohit Shikhar And Rishabh Are Dirty
VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’
Mumbai Indians vs Delhi Capitals match highlights in marathi
MI vs DC : मुंबई इंडियन्सने उघडले विजयाचे खाते, दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी उडवला धुव्वा
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

विराट कोहली – १०३० धावा
रोहित शर्मा – १०२६ धावा
अजिंक्य रहाणे – ८५७ धावा
रॉबिन उथप्पा – ७४० धावा
एमएस धोनी – ७०९ धावा

हेही वाचा – RR vs RCB : राजस्थान रॉयल्सने रचला इतिहास! आयपीएलच्या दोन हंगामात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्माची आकडेवारी –

रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आतापर्यंत ३४ सामने खेळले आहेत. या काळात त्याने ३३ डावांमध्ये ३२.५६ च्या सरासरीने आणि १३१.१४ च्या स्ट्राईक रेटने १०२६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ६ अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत २४७ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने २९.४८ च्या सरासरीने ६३२९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ४२ अर्धशतक आणि १ शतकाचा समावेश आहे.