कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार सलामीवीर फलंदाज आणि फिरकीपटू सुनील नरेन सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२४ मध्ये अफलातून कामगिरी करत आहे. त्याची ही उत्कृष्ट कामगिरी संघाच्या यशात महत्त्वपूर्ण ठरत आहे. नरेनचा फलंदाजीतील पराक्रम सर्वज्ञात आहे, त्याच्याकडे सामन्याची सुरुवात धडाकेबाज करण्याची क्षमता आहे. त्याच्या जबरदस्त षटकार ठोकण्याच्या कौशल्यामुळे त्याला संघाच्या क्रमवारीतही सर्वात वरचे स्थान मिळाले आहे. अशातच सुनील नरेनचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो चक्क बंगाली भाषेत बोलताना दिसतोय.

नरेन या सीझनमधील केकेआरसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने १२ सामन्यांत ३८.४२ च्या स्ट्राईक रेटने ४६१ धावा केल्या आहेत. या सीझनमध्ये त्याने शतकही ठोकले आहे. मैदानात अफलातून कामगिरी करणारा सुनील नेहमी आपल्याला गंभीर दिसतो, तो क्वचितच हसतो.

IPL 2024: शुबमन गिलने स्टेडियममध्येच अभिषेक शर्माच्या आईला खाली वाकून केला नमस्कार, Video व्हायरल

अशातच टीम कोलकाता नाइट रायडर्सने सुनील नरेनचा एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेनने बंगालीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करून त्याचे भाषिक कौशल्य दाखवले. त्याच्या टीम कोलकाता नाइट रायडर्सने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो काही शब्दांना बंगाली भाषेत नेमकं काय बोलतात हे सांगताना दिसतोय. हॅलो, थँक्यू, गुड मॉर्निंग, हाउ आर यू अशा अनेक शब्दांना बंगाली भाषेत काय बोलतात हे तो अगदी हसतमुख चेहऱ्याने सांगतोय. चाहत्यांनाही त्याचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

अनेक चाहत्यांनी या व्हिडीओखाली हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा KKR हा पहिला संघ ठरला आहे. सध्या १३ सामन्यांमध्ये १० गुणांसह (९ सामन्यात विजय आणि ३ सामन्यात पराभव) गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे.

या सीझनमध्ये खेळताना सुनील नेरनने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १२ सामन्यांमध्ये त्याने एकूण ४६१ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने गोलंदाजी करताना १५ विकेट्सही घेतल्या आहेत. या सीझनमध्ये फलंदाजी करताना त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. नरेनने सर्वोत्तम १०९ धावा केल्या आहेत. त्याने क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच शतक झळकावले आहे.

आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला. १३ सामन्यांत ९ वेळा विजय मिळवून KKR चे सध्या १९ गुण आहेत. पुढचा सामना जिंकल्यास त्यांचे २१ गुण होतील आणि वस्तुस्थितीबद्दल बोलायचे झाले तर आता कोलकात्याला पहिल्या स्थानावरून कोणीही हटवू शकत नाही.