सनरायझर्स हैदराबाद वि दिल्ली कॅपिटल्सच्या सामना आज अरूण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावत हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. एका वेगळ्याच भन्नाट फॉर्मात असलेले हैदराबादचे सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी अविश्वसनीय फलंदाजी केली आहे. अवघ्या २.४ षटकांत या दोघांनीही संघाची धावसंख्या ५० धावांच्या घरात नेली. या दोघांनीही पॉवरप्लेमध्ये म्हणजेच अवघ्या ६ षटकांमध्ये १२५ धावा केल्या आहेत. आयपीएल आणि टी-२० च्या इतिहासातील ही सर्वात मोठी पॉवरप्लेमधील संख्या आहे.

T20 क्रिकेटमधील पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या

Radha Yadav Stuck in Gujarat Floods Rescued by NDRF Team
Radha Yadav: पुरात अडकली होती भारतीय महिला क्रिकेटपटू, NDRF च्या पथकाने केली सुटका, पोस्ट करत मानले आभार
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
japans tomiko itooka news
Tomiko Itooka : जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती कोण? ‘या’ महिला गिर्यारोहकाने पटकावला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब!
ENG vs SL 1st Test Who is Harry Singh Son of India Former Player RP Singh Senior in England Test Team
ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी?
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान
lokmanas
लोकमानस: चौथ्या स्थानाचे दुखणे
Kieron Pollard hit 5 consecutive sixes in the hundred league
६,६,६,६,६…Kieron Pollard तात्यांचा कहर! राशिद खानच्या एकाच षटकात ठोकले तब्बल ‘इतके’ षटकार, VIDEO व्हायरल
Aman Sehrawat Becomes Indias youngest Olympic medalist
Aman Sehrawat: अमन सेहरावतने ऑलिम्पिक पदक जिंकत घडवला इतिहास, भारतासाठी ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

१) सनरायझर्स हैदराबाद – १२५/० वि दिल्ली कॅपिटल्स, २०२४

२) नॉटिंगहॅमशायर – १०६/० वि डरहम, २०१७

३) कोलकाता नाइट रायडर्स – १०५/० वि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, २०१७

४) सेंट किट्स आणि नेव्हिस देशभक्त – १०५/० वि बार्बाडोस ट्रायडेंट्स, २०१७

५) दक्षिण आफ्रिका – १०२/० वि वेस्ट इंडीज, २०२३

आयपीएलच्या पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या

१२५/०- एसआरएच वि डीसी, २०२४*
१०५/० – केकेआर वि आरसीबी, २०१७
१००/० – सीएसके वि पीबीकेएस, २०१४
९०/० – सीएसके वि एमआय, २०१५
८८/१ – केकेआर वि डीसी, २०२४*

ट्रॅव्हिस हेड एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्मा तुफान फटकेबाजी करत होते. पहिल्याच षटकात हेडने एक षटकार आणि दोन चौकार तर अभिषेकने एक चौकार लगावत १९ धावा केल्या. या दोघांनीही अवघ्या २.४ षटकांत ५० धावांचा तर ५ षटकांत १०० धावांचा आकडा गाठला आणि मोठी गोष्ट म्हणजे एकही विकेट न गमावता ही मोठी धावसंख्या उभारली. ट्रॅव्हिस हेडने अवघ्या १६ चेंडूत आपले अर्धशतर झळकावले.

६ षटकांमधील गोलंदाज आणि धावा
खलील अहमदचे पहिले षटक- १९ धावा
ललित यादवचे दुसरे षटक – २१ धावा
नॉर्कियाचे तिसरे षटक- २२ धावा
ललित यादवचे चौथे षटक – २१ धावा
कुलदीप यादवचे पाचवे षटक – २० धावा
मुकेश कुमारचे सहावे षटक – २२ धावा

सहाव्या षटकापर्यंत ट्रॅव्हिस हेड २६ चेंडूत ट्रॅव्हिस हेडने २६ चेंडूत ८४ धावा केल्या आहेत. तर अभिषेक शर्मा १० चेंडूत ४० धावा करत मैदानात होता.