Virat Kohli and Gautam Gambhir hugging each other : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स संघांत आयपीएल २०२४ मधील १०वा सामना खेळला गेला. या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नाबाद ८३ धावांच्या जोरावर ६ बाद १८३ धावा केल्या. या डावा दरम्यान विराट कोहलीने आणि गौतम गंभीरने एकमेकांची भेट घेतली आणि मिठी मारली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना डावातील १६ षटकांनंतर स्ट्रेटेजिक टाइम आऊट सुरु असताना घडली. यादरम्यान विराट कोहलीने आणि गौतम गंभीर एकमेकांन भेटताना दिसले. स्ट्रेटेजिक टाइम आऊटदरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू रणनीती तयार करत होते. यावेळी कोलकाता कॅम्पमधील गौतम गंभीर आणि आरसीबीकडून विराट कोहली भेटले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
MLA Nilesh Lanke resign
निलेश लंकेंनी लोकसभेसाठी अखेर राजीनामा दिला; भावूक होत म्हणाले, “पवार साहेबांना त्रास दिला…”
rahul gandhi bharat jodo nyay yatra will end with rally at shivaji park in mumbai
“भाजपाचं सरकार गेलं की बघून घेऊ”, १७०० कोटींच्या नोटीशीनंतर राहुल गांधींचा सीबीआय, ईडीला इशारा
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

यादरम्यान गंभीरने हातवारे करत विराट कोहलीला काही तरी विचारताना दिसला. यावेळी दोन्ही खेळाडू खूप आनंदी दिसत होते. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याआधी गेल्या मोसमात दोघांमध्ये वाद झाला होता. गंभीर तेव्हा लखनऊ सुपर जायंट्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग होता.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानाचा फायदा घेत संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १८२ धावा केल्या. यादरम्यान विराट कोहलीने नाबाद ८३ धावांची खेळी करत महत्वाचे योगदान दिले. संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. ग्रीन २१ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रसेलने ग्रीनला आपला बळी बनवले.

हेही वाचा – KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज

आरसीबी संघाला तिसरा धक्का मॅक्सवेलच्या रूपाने बसला, ज्याला नरेनने आपला बळी बनवले. या सामन्यात रजत पाटीदार आणि अनुज रावत प्रत्येकी तीन धावा करून बाद झाले. त्याचवेळी दिनेश कार्तिकने कोहलीसह सहाव्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली. कोलकाताकडून आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर सुनील नरेनला एक यश मिळाले.