Virendra Sehwag Mocks Adam Gilchrist: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या स्पष्ट आणि मजेशीर वक्तव्यांसाठी ओळखला जातो. सेहवागच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट चांगल्याच व्हायरल होतात. तर त्याची वक्तव्यही चर्चेचा विषय ठरतात. त्याच्या विनोदाने तो समोरच्याला हसवतोही आणि काहीवेळेस त्याची बोलतीही बंद करतो. अशाच एक प्रकार क्लब प्रेरी फायर या पोडकास्टमध्ये घडला, या पोडकास्टमध्ये इतर देशातील दिग्गज खेळाडूंसोबत तो बोलत असतानाचे त्याचे एक वक्तव्य व्हायरल झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सोमवारी क्लब प्रेरी फायर पॉडकास्टमध्ये ॲडम गिलख्रिस्ट, मायकेल वॉन आणि जेम्स रॉचफोर्ड. यांच्यासोबत गप्पा मारत होता. यादरम्यान ॲडम गिलख्रिस्टने सेहवागला आंतरराष्ट्रीय टी-२० लीगमध्ये भारतीय क्रिकेटपटू सहभागी होण्याच्या शक्यतेबद्दल विचारले, ज्यावर त्याने भलतेच वक्तव्य केले.

हेही वाचा-रोहित शर्माने सांगितला भावूक करणारा प्रसंग, ‘या’ दोन खेळाडूंमुळे लेकीच्या जन्माच्या वेळी ऑस्ट्रेलियामध्येच थांबावं लागलं

ॲडम गिलख्रिस्टने विचारले- ‘तुला असं वाटतं का की भारतीय खेळाडू इतर टी-२० लीगमध्ये जाऊन खेळू शकतील?’ यावर वीरेंद्र सेहवागने उत्तर दिले – “नाही, काही गरज नाही. आम्ही श्रीमंत लोक आहोत, आम्ही गरीब देशांमध्ये खेळायला जात नाही. यानंतर तो हसायला लागला.”

सेहवागने त्यानंतर बीबीएलचा मोठा करार नाकारल्याचा एक प्रसंग शेअर केला. तो म्हणाला- “मला अजूनही आठवते की जेव्हा मला भारतीय संघातून वगळण्यात आले, तेव्हा मी आयपीएल खेळत होतो. मला त्याचवेळेस बीबीएलमध्ये खेळण्याची ऑफर आली. मी म्हणालो ठीक आहे, किती पैसे मिळतील? तो म्हणाला $१००,००० (ऑस्ट्रेलियन डॉलरची ही रक्कम भारतातील ५४.१६ लाख रुपये आहे). मी म्हणालो की, मी माझ्या सुट्टीत त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करतो. काल रात्रीचे बिल देखील $१००,००० पेक्षा जास्त होतं.” सेहवाग सध्या आयपीएल २०२४ मध्ये क्रिकेट तज्ञ म्हणून काम करत आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virendra sehwag mocks adam gilchrist in podcast said we are rich people we dont go to poor countries bdg
First published on: 24-04-2024 at 18:16 IST