Irfan Pathan makes serious allegations against Kiran More: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि समालोचक इरफान पठाणने माजी यष्टीरक्षक किरण मोरेवर मोठा आरोप केला आहे. त्याने म्हटले आहे की माजी यष्टीरक्षकाने विल्यम्सला बडोदा वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक बनवले नाही. कारण त्याने त्याला ‘हॅलो’ म्हटले नाही. द इंडियन एक्स्प्रेसला मिळालेल्या माहितीनुसार पठाणने बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या (बीसीए) अधिकाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. मोरे यांच्या कृती आणि वक्तव्यामुळे आपण त्रस्त असल्याचे त्यानी म्हटले आहे. पठाणच्या या आरोपानंतर बडोदा क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे.

किरण मोरे हे बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) अध्यक्ष आहेत. इरफान पठाण हा त्याचा सदस्य आहेत. नुकतीच बडोदा संघाच्या नवीन प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी बैठक झाली. पठाणला या हंगामात संघासाठी स्थानिक प्रशिक्षक हवा होता आणि मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी माजी खेळाडू कॉनर विल्यम्सचे नाव सुचवले. परंतु, सीएसी हे मान्य केले नाही.

Gautam Gambhir Secret Obsession Made KKR Struggle To Find Room In Hotel
गौतम गंभीरसाठी KKR ला हॉटेल शोधताना अडचणी, वसीम अक्रमने उघड केलं सिक्रेट; म्हणाला, “त्याचा हट्ट..”
Rohit Sharma on Mumbai Indians captaincy
रोहित शर्माचं मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत पहिल्यांदाच स्पष्ट विधान; म्हणाला, “संघात नवीन आलेल्यांनी माझे विचार..”
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

काय म्हणाला इरफान पठाण?

इरफान पठाणने पत्रात लिहिले की, “आजच्या सीएसी बैठकीत उपस्थित झालेल्या चिंतेकडे मी लक्ष वेधून घेऊ इच्छितो. बडोदा क्रिकेटच्या एका सदस्याचा समावेश असलेली एक विशिष्ट घटना आमच्या प्रतिष्ठित संस्थेच्या अधोगतीला हातभार लावणारी घटना समोर आल्याने मी अत्यंत निराश झालो आहे. किरण मोरे यांच्या सभेतील वर्तन आणि वक्तव्यांमुळे अस्वस्थ झालो आहे.”

हेही वाचा – US Open: लक्ष्य सेनने शंकरला हरवून गाठली उपांत्य फेरी, तर पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर

किरन मोरेवर इरफान पठाणचा मोठा आरोप –

इरफान पठाण पुढे म्हणाला, “मोरे म्हणाले की, जर त्याने त्याला “हॅलो” म्हटले नाही तर तो कॉनर विल्यम्सला बडोदा रणजी संघाच्या कोचिंग सेटअपमध्ये सामील होण्यापासून रोखेल. माझ्या मते हे एक मूर्ख विधान आहे. अशा प्रकारची वागणूक मोरे यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीला शोभत नाही आणि याचा संस्थेवर वाईट परिणाम होतो.”

विल्यम्स स्वतः रणजी चॅम्पियन आहे –

असोसिएशनने अशा बाबींवर उठून बडोदा क्रिकेटच्या भल्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन इरफान पठाणने केले आहे. त्याने पुढे लिहिले की, “विलियम्स स्वतः रणजी ट्रॉफी चॅम्पियन आहेत आणि बडोदा क्रिकेटचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील एक दशक समर्पित केले आहे. त्यांच्या योगदानाची आपण कबुली देणे आणि त्याचा सन्मान करणे हेच योग्य आहे. आमची संस्था कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठी आहे आणि आम्ही हे मूलभूत तत्त्व लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.”

हेही वाचा – IND vs WI 1st Test: आर अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध १२ विकेट्स घेत रचला इतिहास, ‘या’ बाबतीत मुरलीधरनला टाकले मागे

हा सर्व प्रकार बडोदा क्रिकेटच्या सीईओसमोर घडला –

इरफान पठाणने बडोदा क्रिकेटच्या निर्णयकर्त्यांना मध्यस्थी करून समस्या तातडीने सोडवण्याची विनंती केली आहे. तो म्हणाला, “आपण आपल्या संघटनेत व्यावसायिकता, आदर आणि निष्पक्षतेचे वातावरण राखणे आवश्यक आहे. वैयक्तिक नाराजी आणि किरकोळ मतभेद बडोदा क्रिकेटच्या प्रगतीत आणि एकात्मतेला बाधा आणू देऊ नका. हे सर्व बडोदा क्रिकेटच्या सीईओसमोर घडले.”

मुकुंद परमार यांना मुख्य प्रशिक्षक केले –

पठाण आणि मोरे या दोघांशीही द इंडियन एक्स्प्रेसने या प्रकरणी संपर्क साधला होता, परंतु दोघेही टिप्पणीसाठी उपलब्ध नव्हते. दरम्यान, सीएसीने गुजरातचे माजी फलंदाज मुकुंद परमार यांची बडोदा वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, तर कर्नाटकचे माजी वेगवान गोलंदाज एस अरविंद यांना या हंगामासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.