Ishant Sharma praises Mohammad Siraj: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची अलीकडची कामगिरी चांगलीच राहीली आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला या वेगवान गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, पण हळूहळू त्याने आपल्या खेळात सुधारणा केली आणि आता तो टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आगामी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसह सिराजची भूमिका खूप महत्त्वाची असेल.

दरम्यान, टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने मोहम्मद सिराजचे कौतुक करत सध्याच्या भारतीय संघातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, बुमराहचा प्रभाव त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, परंतु दुखापतीपासून मुक्त राहण्यासाठी क्रिकेटपटूने हुशारीने खेळले पाहिजे. त्याच वेळी, मुकेश कुमार, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग हे खेळाडू भारताच्या वेगवान गोलंदाजीचे भविष्यातील स्टार असल्याचेही त्यानी सांगितले.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Dipendra Singh Airee Sixes Video
Dipendra Singh Airee : ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत नेपाळच्या फलंदाजाने कतारच्या गोलंदाजाला फोडला घाम, पाहा VIDEO
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

जिओ सिनेमाच्या शोमध्ये बोलताना इशांत शर्मा म्हणाला, “सिराज हा भारताच्या वेगवान गोलंदाजीचा स्टार आहे. बुमराहचा समावेश करायचा की नाही हे फिटनेसवर अवलंबून आहे. मला वाटते बुमराहला समजूतदारपणे खेळावे लागेल. विश्वचषकापर्यंत कसोटी मालिका नसल्याने त्यांना फक्त मर्यादीत षटकांचे क्रिकेट खेळावे लागणार आहे. त्यानंतर मुकेश कुमार, नवदीप सैनी, आवेश खान, अर्शदीप आणि उमरान मलिक हे गोलंदाजीतील स्टार्स आहेत.”

हेही वाचा – IND vs PAK:’…तर पाकिस्तान Asia Cup आणि World cup स्पर्धेत अतिशय धोकादायक ठरेल’; आर आश्विनची भविष्यवाणी

आशिया कपसाठी भारताचे वेगवान त्रिकूट सज्ज –

वेस्ट इंडिज मालिकेनंतर सिराज आणि शमी या दोघांना आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. दुसरीकडे, आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने अतिशय प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे भारताने ही मालिका २-० अशी जिंकली.
शार्दुल ठाकूर आणि दिग्गज कृष्णासह तिन्ही वेगवान गोलंदाज सध्या आशिया चषक सुरू होण्यापूर्वी बंगळुरूमध्ये प्रशिक्षण सत्रांतर्गत आहेत. या चारपैकी मोहम्मद शमी नेट्समध्ये कमालीची चांगली कामगिरी करत आहे. आजपासून सुरु झालेल्या आशिया कपमध्ये तो घातक ठरू शकतो. मात्र, भारताचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.