भारताच्या जोश्ना चिनप्पाने व्हिक्टोरियन स्क्वॉश स्पध्रेचे जेतेपद पटकावले. तिने दुसऱ्या मानांकित डेन्मार्कच्या लिने हॅन्सन हिला ११-५, ११-४, ११-९ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. तिचे हे दहावे जेतेपद आहे. पुरुष गटात ऑस्ट्रेलियाच्या रियान कुस्केलीने स्कॉटलंडच्या ग्रेग लोबानचा १२-१०, १३-११, ११-९ असा पराभव करून बाजी मारली.