कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारताच्या मार्गात बेल्जियमचा अडथळा

२०१६ मध्ये कनिष्ठ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बेल्जियमला २-१ असे पराभूत केले होते.

भुवनेश्वर : धारदार आक्रमण आणि ‘ड्रॅग-फ्लिकिंग’मधील चमकदार कामगिरीच्या जोरावर सलग दोन सामने जिंकणाऱ्या गतविजेत्या भारतापुढे बुधवारी कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचे आव्हान असेल.

भारताला यंदाच्या स्पर्धेची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. फ्रान्सकडून सलामीला ४-५ असा पराभव पत्करल्यानंतर मात्र भारतीय संघाने खेळात कमालीची सुधारणा केली. ‘ब’ गटात त्यांनी कॅनडा (१३-१) आणि पोलंडचा (८-२) धुव्वा उडवत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, आता एकूण तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा कनिष्ठ विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारताची कसोटी लागणार आहे. २०१६ मध्ये कनिष्ठ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बेल्जियमला २-१ असे पराभूत केले होते. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी बेल्जियमचा संघ उत्सुक आहे. भारतीय संघाकडून उपकर्णधार संजय कुमारने सलग दोन हॅट्ट्रिक केल्या असून त्याच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Junior hockey world cup india vs belgium quarterfinal match preview zws

ताज्या बातम्या