क्वालालंपूर : दोन गोलच्या पिछाडीनंतरही जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाने कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत नेदरलँड्स संघावर ४-३ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान मिळाले. भारताचा सामना गुरुवारी जर्मनीशी होईल.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या व चौथ्या स्थानी असलेल्या भारत व नेदरलँड्स यांच्यातील उपांत्यपूर्व सामना चुरशीचा झाला. मध्यांतरापर्यंत नेदरलँड्सचा संघ २-० असा आघाडीवर होता. यानंतर, भारताने पुनरागमन करताना उत्तरार्धात चार गोल झळकावले. नेदरलँड्सकडून टिमो बाएर्स (पाचव्या मिनिटाला), पोपिन व्हॅन डर हेडेन (१६व्या मि.) आणि ऑलिव्हियर होर्टेनसियस (४४व्या मि.) यांनी गोल केले. तर, भारताकडून आदित्य लालागे (३४व्या मि.), अराईजीत सिंग हुंडल (३६व्या मि.), आनंद कुशवाह (५२व्या मि.) आणि कर्णधार उत्तम सिंग (५७व्या मि.) यांनी गोल झळकावले.

Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

हेही वाचा >>> U-19 World Cup: अंडर-१९ पुरुष विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

नेदरलँड्स संघाने पहिल्या सत्रात आक्रमक सुरुवात करताना पेनल्टी कॉर्नरच्या साहाय्याने बोएर्सने गोल झळकावत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्राच्या पहिल्या मिनिटाला व्हॅन डर हेडेनने दुसऱ्या पेनल्टी कॉर्नवर गोल करीत संघाची आघाडी दुप्पट केली. ही आघाडी संघाने मध्यांतरापर्यंत कायम राखली. तिसऱ्या सत्रात लालागेने गोल करत संघाची आघाडी कमी केली आणि दोन मिनिटानंतरच अराईजीतने पेनल्टी स्ट्रोकचे रूपांतर गोलमध्ये करीत सामना २-२ असा बरोबरीत आणला. याच सत्रात ऑलिव्हियरने गोल करत नेदरलँड्सला पुन्हा ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या दहा मिनिटांत भारतीय संघाने आक्रमक हॉकीचे प्रदर्शन करताना दोन गोल झळकावले. कुशवाहने गोल करीत सामना ३-३ असा बरोबरीत आणला. भारताच्या ५७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, यावर उत्तम सिंगने गोल करत संघाला ४-३ असे आघाडीवर नेले. अखेरच्या दोन मिनिटांमध्ये नेदरलँड्स संघाने बरोबरीचा प्रयत्न केला, मात्र भारतीय बचावफळीने त्यांना कोणतीही संधी दिली नाही. अखेरच्या सत्रात रोहितने सलग सहा पेनल्टी कॉर्नर रोखले. या कामगिरीसाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.