जर्मनीच्या सुहल शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर नेमबाजी अजिंक्यपद स्पध्रेत लैंगिक छळवणूक केल्याच्या आरोपाखाली दोन नेमबाजांवर भारतीय राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने निलंबनाची कारवाई केली आहे. सुहल स्पध्रेनंतर महिला शॉटगन नेमबाजाने या दोन पुरुष नेमबाजांविरोधात नेमबाजी संघटनेकडे तक्रार केली. या दोघांची चौकशी चालू असेपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
फिनलँडमध्ये होणाऱ्या आगामी शॉटगन अजिंक्यपद स्पध्रेसाठी या दोन पुरुष नेमबाजांची निवड झाली होती. परंतु त्यांच्याविरोधात तक्रार आल्यानंतर त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
सुहल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर नेमबाजी अजिंक्यपद स्पध्रेत भारताने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्य अशी आठ पदकांची कमाई केली होती. या चमूत तिघांचाही समावेश होता.