पंजाबची विजयी सलामी

थिसारा परेराच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत गुरुवारी होबार्ट हरिकेन्सवर १४ चेंडू आणि पाच विकेट राखून विजय मिळवला.

थिसारा परेराच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत गुरुवारी होबार्ट हरिकेन्सवर १४ चेंडू आणि पाच विकेट राखून विजय मिळवला.
होबार्टने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ६ बाद १४४ धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये जोनाथल वेल्स आणि ट्रेव्हिस ब्रिट यांनी जलदगतीने प्रत्येकी २८ धावा जमावल्या. पंजाबकडून थिसाराने १७ धावांत २ बळी मिळवले. होबार्टच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नसली तरी ग्लेन मॅक्सवेलने २५ चेंडूंत ४ चौकार २ षटकारांच्या जोरावर ४३ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. मग पंजाबची ५ बाद ७७ अशी अवस्था झाली. परंतु जॉर्ज बेली (नाबाद ३४) आणि थिसारा परेरा (नाबाद ३५) यांनी सहाव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचून पंजाबला सामना जिंकून दिला.
 
Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kings xi punjab begin clt20 campaign with convincing win

ताज्या बातम्या