इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत फ्लॉप ठरल्यानंतर भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज केएल राहुलवर बरीच टीका झाली. राहुलला संघातून बाहेर बसवा, अशी मतेही समोर येऊ लागली होती. मात्र, पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त शतक ठोकत राहुलने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 108 धावांची संयमी खेळी केली. शतकाव्यतिरिक्त त्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

विराटला टाकले मागे

सर्वात कमी डावात 1500 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत राहुलने विराट कोहलीला मागे सोडले. 106 धावा पार करताच राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1500 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने विराट कोहलीला मागे सोडले. राहुलने एकदिवसीय सामन्यांच्या 36 डावांमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या, तर विराट कोहलीने 38 डावात ही कामगिरी केली आहे.

राहुलचे हे इंग्लंडविरुद्धचे पहिले एकदिवसीय शतक आहे. तर, या प्रकारातील हे त्याचे पाचवे शतक आहे. राहुलने आपल्या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकार लगावले. सलामीवीरांच्या अपयशानंतर राहुलने विराट आणि ऋषभसोबत भागीदारी रचत संघाला एक विशाल धावसंख्या उभारण्यात मदत केली.

सर्वात कमी डावात 1500 धावा करणारे भारतीय फलंदाज