नुवान कुलसेकराच्या भेदक आणि अचूक माऱ्यापुढे श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७४ धावांत खुर्दा उडवला. कुलसेकराने २२ धावांत ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडत त्यांचे कंबरडे मोडले. लसिथ मलिंगाने तीन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनाच या वेळी दोन अंकी धावसंख्या गाठता आली. ऑस्ट्रेलियाच्या ७५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचीही ससेहोलपट पाहायला मिळाली. ठरावीक फरकाने श्रीलंकेचे फलंदाज बाद होत गेले, पण कुशल परेराने (२२) अखेपर्यंत किल्ला लढवत संघाला चार विकेट्स आणि १८० चेंडू राखून विजय मिळवून दिला.