ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी श्रीलंकेने १५ सदस्यीय संघ जाहीर केला असून दुखापतींनी वेढलेल्या लसिथ मलिंगाचा समावेश करण्यात आला आहे, मात्र तंदुरुस्त असल्यासच तो खेळू शकेल. मलिंगाच्या घोटय़ावर सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो खेळू शकला नाही. त्याचबरोबर संशयास्पद शैलीच्या आरोपातून मुक्त झालेला फिरकीपटू सचित्र सेनानायकेला या संघात संधी मिळाली आहे.
संघ : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, लहिरू थिरिमाने, दिनेश चंडिमल, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, धम्मिका प्रसाद, नुवान कुलसेकरा, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, दिमुथ करुणारत्ने.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2015 रोजी प्रकाशित
लसिथ मलिंगाला अटींवर संधी
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी श्रीलंकेने १५ सदस्यीय संघ जाहीर केला असून दुखापतींनी वेढलेल्या लसिथ मलिंगाचा समावेश करण्यात आला आहे
First published on: 08-01-2015 at 05:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lasith malinga provisionally picked in sri lanka team