ला लिगा स्पर्धेत मेस्सीचा पराक्रम
क्लब फुटबॉलविश्वात सातत्यपूर्ण गोल करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने ‘ला लिगा’ स्पर्धेत तीनशेव्या गोलसह शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने स्पोर्टिग गाइनवर ३-१ असा विजय मिळवला. ला लिगा स्पर्धेत तीनशे गोल करणारा मेस्सी पहिला खेळाडू ठरला आहे.
वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूसाठीच्या बलोन डी ओर पुरस्कारावर पाचवेळा नाव कोरणाऱ्या मेस्सीने २५ आणि ३१व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाच्या विजयाचा पाया रचला. लुइस सुआरेझने ६७व्या मिनिटाला आणखी एक गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पोर्टिगतर्फे कालरेस कॅस्ट्रोने २७व्या मिनिटाला गोल केला. या विजयासह बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेत ३१ सामन्यात अपराजित राहण्याची किमयाही साधली.
यायाधी ‘ला लिगा’ स्पर्धेत सर्वाधिक गोलांची नोंद ताल्मो झारा (२५१) यांच्या नावावर होता. आता मेस्सी ३०१ गोलांसह अव्वल स्थानी आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो (२४६) तिसऱ्या स्थानी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2016 रोजी प्रकाशित
त्रिशतकवीर !
ला लिगा स्पर्धेत तीनशे गोल करणारा मेस्सी पहिला खेळाडू ठरला आहे.

First published on: 19-02-2016 at 03:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi has scored 4 39 percent of all barcelona goals ever

