World Cup 2023 : न्यूझीलँड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करुन सेमीफायनलमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. न्यूझीलंड अद्याप सेमी फायनलमध्ये पोहचलेला संघ नाही. मात्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन संघ सेमी फायनलमध्ये पोहचण्याची चिन्हं तशी दिसत नाहीत. (Latest Marathi News) पाकिस्तानने इंग्लंडला जर २८७ धावांच्या फरकाने हरवलं तरच सेमी फायनलचं तिकिट पाकिस्तानला मिळू शकतं. अशात पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने पाकिस्तान संघाला एक अनोखा फॉर्म्युला सांगितला आहे.

वसीम अक्रमचा अजब सल्ला

Asports वर आपलं मत मांडताना वसीम अक्रम म्हणाला, “पाकिस्तान टीम सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडल्याचं निश्चित आहे. आता पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये जायचं असेल तर एकच मार्ग आहे. इंग्लंडबरोबर सामना खेळण्याची सुरुवात होताना नाणेफेक जिंकून टीम पाकिस्तानने ५०० धावा कराव्यात. तसंच इनिंग संपली की इंग्लंड टीमला २० मिनिटं ड्रेसिंग रुममध्ये लॉक करावं. ज्यामुळे टाइम आऊट होईल आणि पाकिस्तान ५०० धावांनी सामना जिंकेल. असं झालं तरच पाकिस्तानचा संघ सेमी फायनल गाठू शकतो.” वसीम अक्रमने हसत ही बाब सांगितली. त्यानंतर त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. @CricketopiaCom ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
Virat-Gautham interaction video goes viral
KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

११ नोव्हेंबरला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेट सामना रंगणार आहे. तर अफगाणिस्तान साऊथ अफ्रिका यांच्यातला सामना सुरु आहे. पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान तर अफगाणिस्तानची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान टीमचा रन रेट +0.036 आहे तर अफगाणिस्तानचा रन रेट मायनसमध्ये गेला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी उपांत्य फेरीचे समीकरण खूप कठीण आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना किमान २८० धावांनी विजय मिळवावा लागेल. तर लक्ष्याचा पाठलाग केल्यास ५ षटकांत सामना संपवावा लागेल. अशा स्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे अशक्य झाले आहे.