मुंबई मॅरेथॉन शर्यतीत भारतीय खेळाडूंमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारे बिनिंग लिंगखोई व ललिता बाबर हे खेळाडू आगामी आशियाई मॅरेथॉन शर्यतीत अनुक्रमे पुरुष व महिला गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही शर्यत २४ फेब्रुवारी रोजी हाँगकाँगमध्ये होणार आहे. आशियाई शर्यतीत २१ देशांमधील ४१ अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर के.टी.इरफान याची चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीकरिता पुरुष गटात भारताचा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. महिलांमध्ये गौरवकुमारी हिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. ही शर्यत एक मार्च रोजी होणार आहे.