मंडय़ा, कर्नाटक येथे सुरू असलेल्या ६०व्या सुपर नॅशनल कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने वर्चस्व राखले. पुरुष गटात महाराष्ट्राने भारतीय रेल्वेवर २२-१९ अशी मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राचा संघ ६-९ असा पिछाडीवर होता. मात्र विश्रांतीनंतर महाराष्ट्राने जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. काशिलिंग आडकेच्या खोलवर चढाया आणि गोकुळ शितोळेचा भक्कम बचाव हे विजयाचे वैशिष्टय़ ठरले. महाराष्ट्राने ५ बोनस गुणांची कमाई केली. महिलांमध्ये महाराष्ट्राने बिहारचा ५४-११ असा धुव्वा उडवला. दीपिका जोसेफ, स्नेहल शिंदे यांनी शानदार चढाया केल्या. दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राने अटीतटीच्या लढतीत उत्तर प्रदेशला १०-९ अशी नमवले. मध्यंतराला महाराष्ट्राचा संघ ६-५ असा आघाडीवर होता.  स्नेहल शिंदेने ५ गुण पटकावले.