चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत आयपीएलचे चौथे विजेतेपद नावावर केले. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने अनुभवाचा पुरेपूर वापर करत महत्त्वाच्या क्षणी सामन्याला कलाटणी दिली. त्यामुळे कोलकात्याचं तिसऱ्यांदा विजयी होण्याचं स्वप्न भंगलं. सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपलं मत व्यक्त केलं

“मी चेन्नईबद्दल बोलण्यापूर्वी, मी कोलकात्याबद्दल पहिल्यांदा बोलेन. दबावात असताना पुनरागमन करणं कठीण असतं. मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली. जर चेन्नईबद्दल बोलायचं झालं तर आम्ही खेळाडूंना वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं. खेळाडूंनी निश्चित केलं की धावा बनवत राहायचं. आमचे खेळाडू प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत होते. प्रत्येक अंतिम सामना खास असतो. काही अंतिम सामने असे आहेत की, प्रत्येक १५ मिनिटांच्या अंतराने काही असं झालं की आम्ही हारलो. आशा करतो की पुढच्या सीझनमध्ये चेन्नई पुढे जात राहील. आम्ही जास्त बोलत नाही. सराव आणि मिटिंगमध्ये आम्ही निश्चिंत असायचो. आमचा सराव चांगला झाला.” असं महेंद्रसिंह धोनीने सांगितलं. “मी क्रीडाप्रेमींचे आभार मानतो दक्षिण आफ्रिका असो की आणखी काही..आम्ही जिथे खेळलो तिथे आम्हाला चेन्नईचे फॅन्स भेटले. आम्हाला वाटतं लोकांनी यावं आणि क्रिकेटला प्रोत्साहित करावं. आशा आहे की, पुढच्या वर्षी आम्ही चेन्नईत परत येऊ.” असंही धोनी पुढे म्हणाला.

महेंद्रसिंह धोनीला पुढच्या वर्षीच्या योजनेबद्दल समालोचक हर्षा भोगले यांनी विचारलं. त्यावर महेंद्रसिंह धोनीने आपल्या शैलीत उत्तर दिलं. “मी सांगितलं आहे की, बीसीसीआयवर अवलंबून आहे. आम्हाला निश्चित करावं लागेल चेन्नईची रणनिती काय आहे. पुढे फ्रेंचाइसीला निश्चित करावं लागेल पुढच्या १० वर्षांसाठी काय रणनिती असेल. चांगला संघ निर्माण करणं मुख्य उद्देश असेल.”, असं धोनी उत्तर देताना सांगितलं.

दरम्यान महेंद्रसिंह धोनी विजयी चषक हाती घेतल्यानंतर लगेचच दीपक चाहरच्या हातात सोपवला. त्यानंतर दीपक चाहरने चॅम्पियन लिहिलेला बोर्डजवळ चषक ठेवला. धोनीसह संपूर्ण संघाने पोझ देत फोटो काढला.