नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खेळांचा समावेश आहे. हरयाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही आता समावेश असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याविषयी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, ‘‘देशी खेळांचा समृद्ध वारसा भारताला लाभलेला आहे. त्यामुळे या खेळांचे रक्षण करणे तसेच त्यांचा प्रसार करून हे खेळ लोकप्रिय करण्याचे  क्रीडा मंत्रालयाचे धोरण असेल. या खेळातील खेळाडूंना खेलो इंडिया स्पर्धेसारखे दुसरे चांगले व्यासपीठ असूच शकत नाही. पुढील खेलो इंडियामध्ये योगासनासहित या चार खेळांचा समावेश असेल. त्यामुळे क्रीडाप्रेमींचे या स्पर्धेकडे लक्ष लागले आहे. येत्या काही वर्षांत आणखीन काही देशी खेळांचा खेलो इंडिया स्पर्धेत समावेश करण्यात येईल.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallakhamb game approved as a sport by the ministry of sports zws
First published on: 21-12-2020 at 00:01 IST